Asia Cup 2022 : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर-४ फेरीतील सामने खेळवले जात आहेत. या फेरीत ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला. याच कारणामुळे ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-श्रीलंका लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आव्हान टिकवण्यासाठी भारताला तर आगामी दोन्ही सामने जिंकणे भारतासाठी गरजेचे आहे. याच कारणामुळे भारताकडे सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी कोणते पर्याय आहेत, याावर नजर टाकुया.

हेही वाचा >>> IND vs PAK : पाकिस्तानच्या मुलींमध्ये कोहलीची क्रेझ, भारत-पाक सामन्यातील ‘या’ खास फोटोची होतेय चर्चा

दिनेश कार्तिकला पुन्हा संधी दिली जाऊ सकते

टीम इंडियाने दिनेश कार्तिकला आशिया चषकात पूर्ण संधी न देताच बाहेर ठेवले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. मात्र पंतने या सामन्यात खास गामगिरी केली नाही. तर दुसरीकडे दिनेश कार्तिककडे चांगला अनुभव आहे. तसेच तो फिनिशर म्हणून भूमिका पार पाडू शकतो. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरोधातील सामन्यात संधी देता येईल.

हेही वाचा >>> जो टीम इंडियाच्या पराभवाचे कारण बनला तोच झाला जायबंदी; भारत-पाक सामन्यानंतर पाकिस्तानाचं टेन्शन वाढलं

अक्षर पटेलला संघात स्थान

रवींद्र जडेजा जायबंदी झाल्यामुळे भारतीय ताफ्यात अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला. पटेलकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जाऊ शकते. मात्र जडेजाच्या जागेवर दीपक हुडाला संधी दिली गेली. दीपक हुडा पाकिस्तानविरोधातील सामन्यात आपली जादू दाखवू शकला नाही. पटेलला संधी दिली तर भारताकडे एक आगावीचा गोलंदाज असेल. याच कारणामुळे पटेलला आगामी सामन्यात संधी दिली तर संघाला त्याचा फायदा होऊ शकतो.

हेही वाचा >>> Asia Cup 2022 : भारतापुढे ‘करो या मरो’ची स्थिती; आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेवर विजय हवाच; जाणून घ्या नेमकं गणित

फिरकीपटू आर. अश्विनला एक संधी

फिरकीपटू युझवेंद्र चहलने आशिया चषकात खास कामगिरी करून दाखवलेली नाही. सध्या संघात रवी बिश्नोईच्या रुपात अगोदरच एक फिरकीपटू आहे. त्यामुळे चहलची जागा अश्विनला दिली तर संघामध्ये फिरकीपटूंमध्ये विविधता येईल. अश्विनकडे मोठा अनुभव आहे. त्यामुळे श्रीलंकेविरोधातील सामन्यात तो या अनुभवाचा वापर करू शकेल.