Asia Cup 2022 IND vs SL: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने दुबई येथे आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ लढतीत श्रीलंकेविरुद्ध ७२ धावांची शानदार खेळी करत अनेक विक्रम मोडीत काढले. ‘हिटमॅन’ने २०२२ मधील केवळ दुसरे अर्धशतकच केले नाही तर तो आशिया चषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. आपल्या ७२ धावांच्या खेळीत रोहितने चार उत्तुंग षटकार आणि पाच चौकार लगावले. या षटकारांचा वर्षाव भारतीय खेळाडूंना कितीही सुखावून गेला असला तरी एका सुरक्षा कर्मचाऱ्याला मात्र डोक्याला ताप ठरला आहे. सामन्याचे अपडेट्स लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात रोहितने मारलेले षटकार ऑनलाईन तुफान ट्रेंड होत आहेत, मात्र यातील एक व्हिडीओ विशेष चर्चेत आहे. रोहितने लगावलेल्या चार पैकी तीन षटकार बाजूला आले पण त्यापैकी एकाने दुबई स्टेडियममध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला जाऊन लागला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
भारताच्या फलंदाजीत दहाव्या षटकात असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर रोहितने षटकारांचा वर्षाव केला होता. पहिल्या चेंडूवरच, रोहितने चेंडू असा काही टोलवला की तो थेट सीमारेषेच्या बाहेर गेला. हाच चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेकडून सुरक्षा रक्षकाला लागला. सुरक्षा रक्षकाला फार दुखापत झाली नाही.
रोहितचे तुफान षटकार
रोहित जेव्हा खेळत असेल तेव्हा सर्वांनी जपून राहा असे या व्हिडीओचे कॅप्शन आहे आणि हे नक्कीच त्या रक्षकाला पटले असावे.