यूएईमध्ये होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये रोमहर्षक लढती होत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातही २८ ऑगस्ट रोजी अटीतटीची लढत झाली. या सामन्यात भारताने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता ३१ ऑगस्ट रोजी भारत हाँगकाँगविरोधात लढणार आहे. या सामन्यातही विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारत सज्ज असून त्यासाठी संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> भारताचा ‘हुकुमी एक्का’ परतणार का? दुखापतीतून सावरणाऱ्या बुमराहबद्दल BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

भारतीय संघ हाँगकाँग संघाच्या तुलनेत प्रबळ आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ खेळाडूबदलीचा प्रयोग करू शकतो. पाकिस्तानविरोधातील सामन्यात केएल राहुल गोल्डन डकवर बाद झाला. त्यामुळे पुढील सामन्यात केएल राहुलच्या जागेवर ऋषभ पंतला संधी दिली दिली जाऊ शकते. मात्र दुसरीकडे पहिल्याच सामन्यात चांगली कामगिरी न केल्यामुळे राहुलला लगेच संघातून बाहेर ठेवणे तितकेसे योग्य होणार नाही. त्यामुळे हाँगकाँगविरोधातील सामन्यात राहुलला कायम ठेवले जाऊ शकते.

हेही वाचा >>> “हार्दिक पंड्या मैदानात म्हणजे भारताकडे १२ खेळाडू,” ३ देशांच्या संघांना प्रशिक्षण दिलेल्या माजी खेळाडूने केले तोंडभरून कौतूक

दीपक हुडा, आर.अश्विन, ऋषभ पंत यांना संधी मिळणार?

ऋषभ पंतने वेस्ट इंडिजसोबतच्या मालिकेत चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे सध्या फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला संघात संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर दीपक हुडालादेखील संधी देणे गरजेचे आहे. दीपक एक धडाकेबाज फलंदाज असून त्यानेदेखील आपला फॉर्म कायम ठेवलेला आहे. त्यामुळे दीपक हुडा हार्दिक पंड्या किंवा केएल राहुल यांच्या जागेवरदेखील येऊ शकतो.

हेही वाचा >>> Video : अर्शदीप विरुद्ध आवेश खान! भारत-पाक सामन्यानंतर टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्येच झाली लढत

हार्दिकने पाकिस्तानविरोधातील सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करत विजय मिळवून दिला होता. मात्र आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार करता त्याला थोडा आराम दिला जाणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आर अश्विन हा फिरकीपटूदेखील भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. त्याला हार्दिक पंड्या किंवा युझवेंद्र चहलच्या जागेवर संघात सामील केले जाऊ शकते.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे नेमकं काय? ज्याचा फटका भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांना बसला

असा आहे भारताचा संघ

रोहित शर्मा ( कर्णधार), केएल (उपकर्णधार ), विराट कोहली (सूर्यकुमार, दीपक हुड्डा, ऋषभ पंत विकेटकीपर), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक ), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्वीन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वरकुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान

हाँगकाँगविरोधात असू शकते असा संघ

रोहित शर्मा, केएल राहुल / ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या / दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान, युझवेंद्र चहल / आर अश्विन

Story img Loader