Sri Lanka Winning Price Money: एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना चार आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी दिली. वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू खेळी, भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी मात करून सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. आर्थिक संकटामुळे राजकीय अशांती पसरलेल्या श्रीलंकेला या विजयांनंतर कोट्यवधींचे बक्षिसांची रक्कम मिळाली आहे. आशिया चषकातील उपविजेते पाकिस्तानवरही बक्षिसांचा वर्षाव झाला. या दोन्ही संघांना किती रुपयांचे बक्षीस मिळाले जाणून घ्या.

आशिया चषक २०२२ चे विजेते म्हणजेच श्रीलंकेच्या संघाला सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दीड लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. दुसरीकडे, पाकिस्तानला आशियाई क्रिकेट काउन्सिल (ACC) कडून बक्षीस म्हणून सुमारे ६० लाख रुपये मिळाले.

Video: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्षांनी भारतीय पत्रकाराचा फोन हिसकावला; चिडून म्हणाले तुम्ही भारतीय तर..

याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्येही श्रीलंकेची चांदी झाली. प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार जिंकणारा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला सुमारे १२ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. अंतिम फेरीतील सामनावीर ठरलेल्या भानुका राजपक्षेला सुमारे ४ लाख रुपये तर बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी ३ हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.

Video: ए भाई जरा.. पाकिस्तानच्या पराभवानंतर दिल्ली पोलिसांची मजेशीर टीका; व्हिडीओ झाला Viral

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २० षटकांत ६ बाद १७० (भानुका राजपक्षे नाबाद ७१, वानिंदू हसरंगा ३६; हॅरिस रौफ ३/२९) विजयी वि. पाकिस्तान : २० षटकांत सर्वबाद १४७ (मोहम्मद रिझवान ५५, इफ्तिकार अहमद ३२; प्रमोद मदूशान ४/३४, वानिंदू हसरंगा ३/२७)

Story img Loader