आशिया कपमध्ये बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात मैदानातच खेळाडू भिडल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याच्यावर बॅट उगारल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या काही खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पण मैदानातील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं?

अफगाणिस्तानला ६ बाद १२९ असे रोखल्यानंतर पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर अडखळला होता. १९ व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर आसिफ बाद झाल्यानंतर फरीदने त्याच्यासमोर जाऊन आक्रमकपणे आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर चिडलेल्या आसिफने त्याला मागे ढकललं. यानंतर फरीद पुन्हा पुढे आल्यानंतर आसिफने त्याच्यावर बॅट उगारत संताप व्यक्त केला. यानंतर अफगाणिस्तानच्या इतर खेळाडूंनी फरीदला बाजूला नेत वाद मिटवला.

Video : पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव करताच मैदानात राडा, प्रेक्षकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

विजयासाठी अखेरच्या षटकांत ११ धावांची आवश्यकता असताना नसीम शाहने फजलहक फारुकीच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत पाकिस्तानचा विजय साकार केला. फरीदने आसिफचा अनादर केल्याने नसीन शाहने दोन षटकार लगावत त्याचा बदला घेतला अशी चर्चा पाकिस्तानी चाहते करत आहेत.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजाना फार काही मोठी मजल मारता आली नव्हती. आक्रमक सलामीनंतर अफगाणिस्तानचा डाव अडखळला होता. मोहम्मद नवाझ आणि शादाब खान यांच्या फिरकीने अफगाणिस्तानला रोखले होते.

Asia Cup 2022 : रोमहर्षक विजयासह पाकिस्तान अंतिम फेरीत

कमी धावसंख्येच्या आव्हानानंतरही अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक गडी राखून पराभव केला आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. यामुळे भारत आणि अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आलं आहे.

संक्षिप्त धावफलक अफगाणिस्तान : २० षटकांत ६ बाद १२९ (इब्राहिम झादरान ३५, हजरतुल्ला झझाई २१; हरिस रौफ २/२६) पराभूत वि. पाकिस्तान : १९.२ षटकांत ९ बाद १३१ (शादाब खान ३६, इफ्तिकार अहमद ३०; फजलहक फरुकी ३/३१, फरिद अहमद ३/३१)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 pakistan asif ali almost hits afghanistan bowler fareed ahmed with bat in ground sgy