भारताचा वेस्ट इंडीज दौरा झाल्यानंतर आशिया चषकाचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा श्रीलंकेमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, श्रीलंकेतील सध्याची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती बघता तिथे स्पर्धेचे आयोजन होणे शक्य नसल्याचे संकेत लंकन क्रिकेट मंडळाच्या सचिवांनी दिले आहेत. श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमरातीमध्ये (युएई) आशिया चषकाचे आयोजन होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंका क्रिकेटचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या श्रीलंकेत अनेक आठवड्यांपासून सरकारविरोधात प्रचंड निदर्शने सुरू आहेत. देशातील राजकीय अस्थिरतेमुळे आशिया चषक श्रीलंकेबाहेर हलविला जाण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाऊ शकते.’ आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) लवकरच स्पर्धेच्या ठिकाणातील बदलाबाबत अधिकृत घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे एसीसीचे प्रमुख आहेत.

हेही वाचा – शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांतच मैदानावर उतरला राहुल! सराव करतानाचा व्हिडीओ आला समोर

सहा संघांच्या या स्पर्धेच्या तारखेत बदल होण्याची शक्यता नाही. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार ही स्पर्धा २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. मुख्य स्पर्धेपूर्वी एक पात्रता फेरी होणार आहे. ज्यामध्ये हाँगकाँग, सिंगापूर, कुवेत आणि यूएईचे संघ पात्रता एकमेकांना आव्हान देतील. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे पाच पूर्ण सदस्य संघ थेट प्रवेशासाठी पात्र आहेत.