येत्या २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या चषकापूर्वीच भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ आज युएईला रवाना होणार आहे. त्तपूर्वी करण्यात आलेल्या करोना चाचणीत द्रविडचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे द्रविड भारतीय संघासोबत जाणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. या स्पर्धेदरम्यान संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली जाऊ शकते.

हेही वाचा- IND vs ZIM: मालिका जिंकल्यानंतर ‘काला चष्मा’ गाण्यावर भारतीय संघाचं जंगी सेलिब्रेशन; ईशान किशनचे अतरंगी डान्स मूव्ह्स एकदा पाहाच

व्हीव्हीएस लक्ष्मणकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी ?

यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी होती. एवढचं नाही तर लक्ष्मण गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यातही लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा- भारतीय फुटबॉल महासंघावरील प्रशासकीय समिती संपुष्टात ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आठवडाभर लांबणीवर

आशिया चषकाला २७ ऑगस्टपासून सुरुवात

आशिया चषकाला येत्या २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. २८ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. तर, अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर ४ साठी ६ सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना ३ सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.