Asia Cup 2022 Team India Records: आशिया चषक म्हणजे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. येत्या २७ ऑगस्ट पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) यंदाचे आशिया चषक सामने सुरु होणार आहेत. मालिकेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला भारत विरुद्ध पाकिस्तानचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित सामना असणार आहे. १९८४ ला सुरु झालेल्या आशिया चषकात सुरुवातीपासून भारताचे वर्चस्व आहे. आजवर तब्ब्ल ७ वेळा भारताने आशिया चषकावर आपले नाव कोरले. इतकंच नाही तर या मालिकेत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी वैयक्तिक विक्रम सुद्धा रचले आहेत. भारतीय फलंदाजांनी आशिया चषकात आजवर कायम राखलेला एक विक्रम यंदाही टिकणार का याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. यंदाचे सामने हे टी २० स्वरूपात व डबल राउंड रॉबिन फॉरमॅट मध्ये खेळले जाणार आहेत.

आशिया चषकासाठी संघात कोणाला स्थान?

यंदाच्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. निवडलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे तर केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा संघाचा भाग असणार आहे. हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूंसह रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या क्रिएकटपटुंना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Asia Cup 2022: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; विराट कोहली अन् केएल राहुलचे पुनरागमन तर दुखापतग्रस्त बुमराह बाहेर)

भारतीय संघात यंदा रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, व माजी कर्णधार विराट कोहली अशी फलंदाजांची मजबूत टीम निवडण्यात आली आहे. भारतीय फलंदाज हे कायम आशिया चषकात चमकदार कामगिरी करत आले आहेत. जर का आपण रेकॉर्ड्स पाहिले तर आजवर आशिया चषकाच्या ५० षटकांच्या कोणत्याही सामन्यात एकही भारतीय खेळाडू हा गोल्डन डक म्हणजेच शून्यावर बाद झालेला नाही. तर दुसरीकडे श्रीलंकचे १७, बांग्लादेशचे ११ आणि पाकिस्तानचे नऊ फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत.

Story img Loader