Asia Cup 2022 IND vs PAK: भारत- पाकिस्तानचा सामना उलटून दोन दिवस झाले तरी अजूनही दोन्ही संघांच्या चाहत्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही. सामन्यातील काही खास क्षण अनेकजण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच एक खास व्हिडीओ सुद्धा सध्या तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे आशिया चषकाचा सामना रंगत असताना कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली हे गप्पांमध्ये रंगलेले दिसत आहेत. अनेकांनी यावरून भन्नाट मजेशीर मीम्स बनवून सुद्धा पोस्ट केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिया चषकात रविवारी पार पडलेल्या सामन्यात भारताची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली फार सुरवातीच्या टप्प्यातच बाद झाले होते. रोहित १२ तर विराट ३५ धावा करून माघारी परतले होते. मात्र भारतीय संघाची फलंदाजांची फळी मजबूत असल्याने हे दोघे निवांत होते. म्हणूनच फलंदाजी सुरु असताना पॅव्हिलियन मध्ये विराट चॉकलेट खात रोहितशी गप्पा मारत होता. रोहित यावेळी विराटला फलंदाजीवरूनच काहीतरी सांगत असल्याचे त्याच्या हातवाऱ्यांवरून दिसून येत आहे. (Video: “बाबर आझम कसा कर्णधार झाला कळेना”.. IND vs PAK नंतर शोएब अख्तरची टीका; रोहित शर्मालाही सुनावले)

पहा ट्विट

या फोटोवर कमेंट करून अनेकांनी टीम इंडियाच्या आत्मविश्वासाची दाद दिली आहे. यापूर्वी हार्दिक पांड्याने सुद्धा शेवटचा षटकार मारण्याआधी दिलेल्या शांत व संयमी प्रतिक्रियेमुळे टीम इंडियाची आशिया चषकासाठीची तयारी चर्चेत आली होती. असं असलं तरी रविवारचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा भारतीय संघाने विनाकारण कठीण बनवण्याचा प्रयत्न केला अशा टीका सुद्धा क्रिकेट जगतातून केल्या जात आहेत.

दरम्यान आता भारताचा पुढचा सामना बुधवार ३१ ऑगस्टला हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. आशिया चषकात उर्वरित सामन्यांमध्ये पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान सामना पाहायला मिळणार अशी दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 rohit sharma and virat kohli spotted chilling during ind vs pak match video went viral svs