सध्याच्या टी-२० च्या युगामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुफान फलंदाजी करणारे अनेक फलंदाज आहेत. अगदी सुर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध केलेल्या ३६० डिग्री फटकेबाजीमधूनच मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात षटकार लगावण्याची क्षमता असणारे खेळाडू असल्याचं अधोरेखित केलं. एकीकडे खेळामध्ये बदल होत असतानाच दुसरीकडे प्रशिक्षणामध्येही बदल होताना दिसत आहे. मात्र दरवेळेस हा बदल सकारात्मकच असतो असं नाही. अशीच एक घटना काल म्हणजेच गुरुवारी (१ सप्टेंबर २०२२) आशिया चषक स्पर्धेदरम्यान श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यादरम्यान घडली.

नक्की वाचा >> Asia Cup 2022: क्रिकेट चाहत्यांसाठी Good News! …तर पुन्हा रंगणार Ind vs Pak सामना; पाहा कधी, कुठे, कसा पाहता येणार

करो या मरोच्या या सामन्यामध्ये श्रीलंकन ड्रेसिंग रुममधून कोड्सच्या माध्यमातून मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना माहिती पाठवण्यात आल्याचं दिसून आलं. हा सारा प्रकार खेळ भावनेच्या विरुद्ध असल्याचं म्हणत अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे कर्णधाराला सूचक माहिती पुरवणे हा चिडीचा डाव असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर काहींनी खेळामध्ये सर्वकाही चालतं असं म्हणत या पद्धतीची यापूर्वीही पाठराखण केली आहे.

नक्की वाचा >> US Open Nadal Video: …अन् विचित्रप्रकारे नदालने स्वत:लाच जखमी करुन घेतलं; रॅकेट टाकून कोर्ट सोडलं, डॉक्टरांनी घेतली धाव

श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिलव्हरवूड हे बाजूला बसलेले असताना संघाचे अॅनलिस्ट श्रीलंकन कर्णधाराला कोड्सच्या माध्यमातून संदेश पाठवताना दिसत होते. ड्रेसिंग रुममधील टेबलवर ‘2D’ आणि ‘D5’ असे कोड लिहिल्याचं कॅमेरात कैद झालं. हे संदेश म्हणजे क्षेत्ररक्षणासंदर्भातील सूचना असल्याची माहिती समोर येत आहे. क्षेत्ररक्षण कशापद्धतीने बदलल्यास त्याचा फायदा होईल याबद्दलच्या सांकेतिक खूणा आहेत.

अशाप्रकारे कोड वापरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वी इंग्लंडच्या संघानेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये सामना सुरु असतानाच असे कोड २०२० साली वापरले होते. कर्णधार इयन मॉर्गनला क्षेत्ररक्षणासंदर्भातील सूचना करण्यासाठी या कोड्सचा वापर करण्यात आलेला. यावरुन टीकाही झाली होती. मात्र इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने याला समर्थन दिलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी इंग्लडचं प्रशिक्षकपद सध्या लंकेच्या संघाला धडे देणाऱ्या सिलव्हरवूड यांच्याकडेच होतं.

“जर ड्रेसिंग रुममधून असे संदेश दिले जात असतील तर मैदानामध्ये कर्णधाराची नेमकी भूमिका काय? हे क्रिकेट आहे फुटबॉल नाही,” असा युक्तीवाद श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यादरम्यान झालेल्या या प्रकाराबद्दल बोलताना एका चाहत्याने ट्विटरवरुन केला आहे.

सामना सुरु असताना कर्णधाराला असे संदेश पाठवावेत की नाही यावरुन वाद आणि दुमत असतानाच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या निर्णयाची पाठराखण केली होती. ही कर्णधाराला निर्णय घेण्यासाठी दिलेली माहिती असते. ती स्वीकारुन त्यांची अंमलबजावणी करावी की त्याकडे दूर्लक्ष करावं हा कर्णधाराचा निर्णय असतो. हा केवळ सल्ला असतो तो आदेश नसतो. त्यामुळे सर्व निर्णय कर्णधारच घेतो असा युक्तीवाद इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलेला.

या सामन्यामध्ये श्रीलंकेने बंगालदेशला पराभूत करुन सुपर फोरमध्ये आपलं स्थान निश्चित केलं असून बंगलादेश भराभवामुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला.

Story img Loader