INS vs PAK : यूएईमध्ये सध्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत काल (२८ ऑगस्ट) भारत-पाकिस्तान यांच्यात रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात भारताच्या हार्दिक पंड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मात्र दुसरीकडे पाकिस्तानच्या १९ वर्षीय नसीम शाहदेखील चांगलाच चर्चेचा विषय ठरला. त्याने या सामन्यात केएल राहुल तसेच सूर्यकुमार यादव यासाख्या धडाकेबाज फलंदाजांना तंबुत पाठवले. त्याच्या याच कामगिरीमुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. दरम्यान, फक्त १९ व्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या नसीम शाहच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे चढउतार आलेले आहेत. पाकिस्तानी संघासाठी खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणारा शाह त्याच्या आईच्या अंत्यविधीसाठीदेखील जाऊ शकला नव्हता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> IND vs PAK: हार्दिक पंड्याचा विजयी षटकार अन् अफगाणी चाहत्याने केलेला तो Kiss; पाहा VIRAL VIDEO

२०१९ साली नसीम शाह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. त्यावेळी तो पाकिस्तानच्या ए संघाकडून खेळत होता. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे सामना होणार होता. मात्र आदल्याच रात्री त्याच्या आईच्या मृत्यूचे वृत्त आले होते. हे वृत्त ऐकून बाबर आझमला धक्काच बसला होता. वयाने लहान असल्यामुळे ही दु:खद बातमी ऐकून त्याला धक्का बसेल असे बाबरला वाटले होते. त्यानंतर ही बातमी नसीम शाहला थोड्या उशिराने देण्यात आली.

हेही वाचा >>> “…तर भारत जिंकलाच नसता,” टीम इंडियाला नशिबाने साथ दिली म्हणताच पाकिस्तानी पत्रकारावर भडकले क्रिकेटप्रेमी

नसीम शाहची त्याच्या आईशी भावनिक नाळ जुळलेली होती. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे तो त्याच्या आईच्या अंत्यविधीसाठी जाऊ शकला नव्हता. त्याला आईचे अंतिम दर्शनही घेता आले नव्हते. एकीकडे आईचे निधन झालेले असतानाही तो पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळला होता.

हेही वाचा >>> त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडपून काढलं, पण एका प्रसंगामुळे झाला भावनिक; हार्दिक पंड्याने सांगितलं कारण, म्हणाला

नसीम शाहची त्याच्या आईवर खूप प्रेम करायचा. त्याचे वडील त्याला क्रिकेट खेळण्यास विरोध करायचे. क्रिकेट खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे, असे त्याच्या वडिलांना वाटायचे. अशा वेळी त्याच्या आईनेच त्याला पाठिंबा दिला. वेळप्रसंगी पैसेदेखील पुरवले.

हेही वाचा >>> Video : भारत-पाक सामन्यात रोहित शर्मा थोडक्यात बचावला, डोक्याला चेंडू लागून झाला असता जखमी, नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान, भारतविरोधातील सामन्यात पाकिस्तानी नसीम शाहने भेदक मारा करत भारतीय फलंदाजांना बांधून ठेवलं. त्याने सामन्याच्या पहिल्याच षटकात भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल याला शून्यावर बाद केलं. त्यानंतर सूर्यकुमार यादव यालादेखील बाद करत त्याने भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. या सामन्यात भारताचा विजय झाला. मात्र नसीम शाहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताला विजयासाठी मेहनत घ्यावी लागली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 update ind vs pak pakistani cricketer naseem shah played cricket while death of mother prd