Virat Kohli On Babar Azam : आशिया चषकाला सुरुवात झाली असून आता भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी (२८ ऑगस्ट ) हे दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. दरम्यान, सामना तोंडावर आलेला असताना भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज बाबर आझमविषयी महत्त्वाचे विधान केले आहे. बाबर आझम हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असावा, असे विराट कोहली म्हणाला आहे. विराटने स्टार स्पोर्ट या क्रीडीविषयक वाहिनीशी संवास साधला. यावेळी बोलताना त्यांने वरील वक्तव्य केले.
हेही वाचा >>> सगळे म्हणतात शतक ठोकलंच पाहिजे, पण विराट कोणत्या परिस्थितीतून जातोय? पहिल्यांदाच थेट भाष्य करत म्हणाला, “महिनाभर…”
“बाबर आणि माझं पहिल्यांदा २०१९ च्या विश्वचषकादरम्यान बोलणं झालं. तेव्हा आम्ही खाली बासून खूप साऱ्या गप्पा केल्या होत्या. तो खूप आदराने बोलत होता. तो सध्या अतिशय चांगले क्रिकेट खेळत आहे. सध्या तो जगातील क्रमांक एकचा फलंदाज असावा. मात्र तरीदेखील त्याची समोरच्या व्यक्तीबद्दल आदर करण्याची वृत्ती अजूनही बदललेली नाही. तो नेहमीच नम्रपणे वागतो,” असे विराट कोहली म्हणाला. तसेच, तो प्रतिभावान खेळाडू आहे. तो खेळताना पाहताना मला नेहमीच आनंद होतो, असेदेखील विराटने आवर्जून सांगितले.
हेही वाचा >>> SL vs AFG : पहिल्याच सामन्यात पंचांच्या निर्णयावर नाराजी, श्रीलंकेच्या खेळाडूंनी केला त्रागा
याच मुलाखतीत त्यांने त्याच्या स्वत:च्या खेळावरही भाष्य केले.“मागील दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच मी महिनाभर बॅट हातात घेतली नाही. माझ्यातील उर्जा खोटी असल्याचे मला जाणवले. माझ्यामध्ये शक्ती, उर्जा तसेच चांगले क्रिकेट खेळण्यासाठीची तीव्रता आहे, असे दाखवण्याचा मी खोटा प्रयत्न करत होतो, असे मला जाणवले. मात्र माझे शरीर मला थांबण्यास सांगत होते. तुला आराम हवा आहे. तू एक पाऊल मागे घ्यायला हवे, असे माझे मन मला सांगत होते, असे विराट कोहली म्हणाला.