आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारी (२७ ऑगस्ट) श्रीलंका-अफगाणिस्तान लढतीने प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा आजपासून सुरू होणार असली तरी उद्या (२८ ऑगस्ट) भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. या मालिकेत टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली नक्की तळपेल असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जातोय. मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट चाहते त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस कधी पडणार याची वाट पाहात आहेत. असे असताना त्याने त्याची मानसिक स्थिती तसेच मागील काही दिवसांपासून कोणत्या परिस्थितीतून जात होता, याबद्दल भाष्य केले आहे. मागील काही काळात माझे मानसिक खच्चीकरण झाले होते. दहा वर्षांत मी पहिल्यांदाच महिनाभर बॅट हातात घेतली नाही, असे विराट कोहलीने सांगितले आहे.

हेही वाचा >>> IND vs PAK T20 Asia Cup 2022 : पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी अशी असेल भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’? बीसीसीआयने ट्वीट करत…

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहली ‘स्टार स्पोर्ट’ या क्रीडाविषयक वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या खराब खेळाबद्दल तसेच त्याच्या मानसिक स्थितीवर भाष्य केले आहे. “मागील दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच मी महिनाभर बॅट हातात घेतली नाही. माझ्यातील उर्जा खोटी असल्याचे मला जाणवले. माझ्यामध्ये शक्ती, उर्जा तसेच चांगले क्रिकेट खेळण्यासाठीची तीव्रता आहे, असे दाखवण्याचा मी खोटा प्रयत्न करत होतो, असे मला जाणवले. मात्र माझे शरीर मला थांबण्यास सांगत होते. तुला आराम हवा आहे. तू एक पाऊल मागे घ्यायला हवे, असे माझे मन मला सांगत होते,” असे विराट कोहली म्हणाला.

हेही वाचा >>> विश्लेषण : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला संधी कितपत?

“मानसिक दृष्टीकोनाती मी खूपच दृढ आणि मजबूत असल्याचे माझ्याकडे पाहिले जाते. मात्र प्रत्येकालाच मर्यादा असतात. याच मर्यादा आपण ओळखणे गरजेचे असते. असे केले नाली तर ते आपल्यासाठी हानीकारक ठरते. मी मानसिकदृष्ट्या खचत होतो. हे मान्य करण्यास मला कसलीही लाज वाटत नाही. मानसिक खच्चीकरण होणे ही एक साधारण बाब आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे. कमकूवत असल्याचे कबूल करण्यापेक्षा मजूबत असल्याचे दाखवणे हे फारच वाईट आणि घातक आहे,” असेदेखील विराट कोहली म्हणाला.

हेही वाचा >>> ट्वेन्टी-२०विश्वचषकाच्या सरावाकडे लक्ष; आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ; अफगाणिस्तान-श्रीलंका सलामीची लढत

दरम्यान, विराट कोहली आशिया चषक स्पर्धेत शतकांचा दुष्काळ संपवेल, अशी अपक्षे व्यक्त केली जात आहे. मागील २२ डावांमध्ये (आयपीएल २०२२ आणि आंतरराष्ट्रीय सामने) तो फक्त एकदाच अर्धशतकी खेळी करू शकलेला आहे. सूर गवसत नसल्यामुळे आयपीएल संपल्यानंतर त्याने विश्रांती घेतली होती. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यातही त्याने विश्रांती घेतली होती. त्यामुळे मोठ्या ब्रेकनंतर विराट पुन्हा एकदा नव्या उर्जेने मैदानावर उतरेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.

Story img Loader