Asia Cup 2022 Hardik Pandya: भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा दमदार खेळ आशिया चषक २०२२ च्या सुपर ४ सामन्यात काहीसा मावळलेला दिसतोय. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात विक्रमी खेळी केलेला पांड्या आता सुपर ४ मध्ये सुद्धा पाकिस्तानला भारी पडेल अशा अपेक्षा असताना हार्दिक मैदानात येताच आल्या पावली मागे गेला. असं असलं तरी हार्दिक पांड्यावरचे चाहत्यांचे प्रेम काही कमी झालेले नाही. चाहतेच काय तर पाकिस्तानी आजी- माजी खेळाडू सुद्धा पांड्याच्या प्रत्येक पाऊलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतात. पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज वसीम अक्रमने सुद्धा हार्दिक पांड्याला विनंती करत त्याच्या एका खास व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मागितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…

रविवारी भारत-पाकिस्तान सामन्याच्या स्टारच्या आधी, पंड्याला संजय मांजरेकर यांनी विचारले की मागील काही वर्षात अनेकदा दुबईची वारी केली असताना असा कोणता खास पदार्थ किंवा हॉटेल आवडले आहे का? ज्यावर उत्तर देताना पांड्या म्हणाला. “मी फक्त रात्री क्वचित जेवायला बाहेर जातो. नाहीतर, माझ्यासोबत माझा आचारी असतो जो माझ्या जेवणाची पूर्ण काळजी घेतो. सर्व कॅलरी मोजणे, नियोजनानुसार जेवण बनवतो. पण जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा मी शक्य तितक्या सर्व स्थानिक हॉटेल्समध्ये प्रसिद्ध पदार्थ चाखण्याचा प्रयत्न करतो.

Asia Cup 2022: भारत श्रीलंका आज येणार आमनेसामने; दोन्ही संघाची संभाव्य ‘प्लेइंग ११’ जाणून घ्या

पांड्याने स्वतःचा आचारी सोबत घेऊन फिरत असल्याचे सांगताच वसीम अक्रमच्या चेहऱ्यावर मोठे आश्चर्य दिसले. यानंतर गमतीत त्यांनी पांड्याच्या आचाऱ्यासाठी खास संदेशही पाठवला. पाकिस्तानी माजी कर्णधार म्हणाले “माझी हार्दिकसाठी एक नम्र विनंती आहे. तुम्ही तुमच्या शेफला माझ्याकडे एक दिवसासाठी पाठवू शकता जेणेकरून तो मला काही छान जेवण बनवून देऊ शकेल? सतत हॉटेलमध्ये जेवल्याने मी खूप आजारी असतो,”

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात पांड्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. हा सामना गमावणे भारतासाठी सर्व बाजूंनी मोठा धक्का ठरला आहे. आजच्या सामन्यात हार्दिकच्या बॅटची जादू दिसणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. आज रात्री श्रीलंकेविरुद्ध आणि त्यानंतर गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे दोन सामने जिंकणे आवश्यक असल्याने, पांड्याच्या अष्टपैलू सर्वोत्तम कामगिरीवर खूप आशा आहेत.