आजपासून दुबईत आशिया चषक स्पर्धेला सुरूवात होत आहे. आज श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान हा पहिल्या सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरूवात होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-२० फॉर्मेटमध्ये होणार सामने

आशिया चषकातील सामने टी-२० फॉर्मेटमध्ये खेळवले जाणार आहेत. आधी ग्रुप स्टेमधील सामने खेळवले जातील. हे समाने २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत खेळवले जाणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये पहिजे दोन संघ, असे एकूण चार संघ राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळतील. यातून पहिले दोन संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहेत.

कुठे व कसे पाहता येईल सामने?

आशिया चषकातील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर होणार आहे. तसेच डिझ्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

ग्रुप स्टेज सामन्यांचे वेळापत्रक

27 ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान
28 ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान
30 ऑगस्ट – बांग्लादेश विरुद्ध अफगानिस्तान
31 ऑगस्ट – भारत विरुद्ध हॉंककाँग
1 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
2 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हॉंककाँग

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 will start today in dubai know how and where can see live matches in india spb
Show comments