SL vs BAN Asia Cup Match 2023 Updates: आशिया चषक २०२३ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा सामना ३१ ऑगस्ट रोजी बांगलादेशशी होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ ब गटात आहेत. श्रीलंकेच्या संघाची कमान दासून शनाकाकडे आहे, तर बांगलादेशी संघाचे नेतृत्व शाकिब अल हसनकडे आहे. या सामन्याला दुपारी ३ वाजता पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुशफिकर रहीम आणि मुस्तफिजुर रहमान हे बांगलादेशी संघातील प्रमुख खेळाडू आहेत. कुसल मेंडिस, चरित अस्लंका आणि मथिशा पाथिराना हे लंकन संघातील महत्त्वाचे खेळाडू आहेत. या दोन्ही संघांनी एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत एकूण ५१ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये श्रीलंकेने ४० सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने ९ सामने जिंकले आहेत, दोन सामन्याचा निकाल लागला नाही

पल्लिकेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची विकेट नैसर्गिक आहे. याचा फायदा फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही होऊ शकतो. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात. या विकेटवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २०० धावांची आहे. या विकेटचा पाठलाग करणाऱ्या संघांचे उत्कृष्ट रेकॉर्ड आहेत. या मैदानावर त्याने ६०% सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – भारतीय वंशाच्या तन्वीर संघाचं ऑस्ट्रेलियासाठी झोकात पदार्पण

मात्र, दोन्ही संघ आपापल्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहेत. श्रीलंकेचे खेळाडू वानिंदू हसरंगा, दुष्मंथा, लाहिरू कुमारा आणि दिलशान मधुशंका हे दुखापतींशी झुंजत आहेत, तर कुसल परेरा अद्याप कोविड-१९ मधून बरा झालेला नाही. संघाचे फलंदाज पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने आणि चारिथ असालंका यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तसेच, वर्षभरात आक्रमक फलंदाजी करू न शकलेल्या बांगलादेशविरुद्ध कर्णधार दासून शनाका पुन्हा फॉर्म मिळवेल, अशी आशा संघाला असेल. फिरकीपटू महिश तिक्षिना आणि वेगवान गोलंदाज कसून राजिता यांना मुख्य गोलंदाजांची कमतरता भरून काढावी लागणार आहे.

त्याचवेळी बांगलादेशचा संघही संघर्ष करत आहे. बांगलादेशला दुखापतग्रस्त तमीम इक्बाल, वेगवान गोलंदाज इबादत हुसेन आणि यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास यांची उणीव भासेल. दास अद्याप व्हायरल तापातून बरा झालेला नाही, तो बुधवारी संपूर्ण आशिया कपमधून बाहेर पडला. दासच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज अनामुल हक बिजॉयचा समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशचा संघ घरच्या मैदानावर बलाढ्य आहे, पण या वर्षी इंग्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली होती. कर्णधार शाकिब, मुशफिकुर रहीम आणि नझमुल शांतो यांनी यावर्षी ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. अनुभवी मुस्तफिझूर रहमान, शॉरीफुल इस्लाम आणि तस्किन अहमद यांनी यंदा गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023: बाबर आझमने रचला इतिहास! कोहली-आमलाला मागे टाकत ब्रायन लाराच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

कँडी येथे होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरित अस्लंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेलागे, महेश टीक्षाना, लाहिरू कुमारा, कसुन राजितहना/.

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अनामुल हक, नईम शेख, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, मेहदी हसन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 2nd match sri lanka vs bangladesh playing xi and updates vbm
Show comments