Ind vs Pak, Asia Cup venue: टीम इंडिया सप्टेंबरमध्ये आशिया चषक २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार? नाही तर ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी कुठे होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. वास्तविक, आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) ४ फेब्रुवारी रोजी बहरीनमध्ये बैठक होणार आहे. यामध्ये आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणावर चर्चा होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आशिया चषक २०२३ चे आयोजन पाकिस्तानने केले होते. काही काळापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की, टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही आणि स्पर्धेचे ठिकाण बदलले जाईल. जसे २०१८ मध्ये झाले. जय शाह हे देखील ACC चे अध्यक्ष असल्याने त्यांच्या घोषणेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चिंता वाढली आहे. हताश होऊन पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांनी बीसीसीआयला धमकीही दिली. पीसीबीचे नवे अध्यक्ष नजम सेठी यांनी २३ जानेवारी रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की एसीसी बोर्डाची बैठक ४ फेब्रुवारीला बहरीनमध्ये होणार आहे. यामध्ये आशिया चषकावर चर्चा होणार आहे. यावर तोडगा न निघाल्यास मार्चमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल.
नजम सेठी यांचा बीसीसीआयबाबतचा दृष्टिकोन रमीज राजा यांच्या तुलनेत मवाळ आहे. ते म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूच्या लोकांनाही तेच हवे आहे. सेठी यांच्या मते, दोन्ही देशांमधील क्रिकेटच्या मुद्द्यांवर स्पष्टता आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही मोठ्या कार्यक्रमावर परिणाम होऊ नये.” घडलेल्या मागील घटनेनुसार जय शाह यांच्या भडकावल्यानंतर पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीज राजा यांचा संयम सुटला होता. जर टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानात आली नाही, तर आम्हीही आमचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात पाठवणार नाही, असं तो म्हणाला होता. आशिया चषक इतरत्र हलवल्यास आम्ही स्पर्धेवर बहिष्कार टाकू. मात्र, यानंतर रमीझ जास्त काळ पीसीबीच्या अध्यक्षपदावर राहू शकले नाहीत. त्यांच्या जागी पाकिस्तान सरकारने नजम सेठी यांना अध्यक्ष केले.
जय शाह म्हणाले होते- आशिया चषक पाकिस्तानमध्ये होणार नाही
५ जानेवारी रोजी एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी कॅलेंडर जारी केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, ‘गेल्या काही काळापासून एसीसी बोर्डाची बैठक झालेली नाही आणि अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी एका निर्णयाला आम्ही आव्हानही दिले. आता चांगली बातमी अशी आहे की आम्ही एसीसी अध्यक्षांना बोर्डाच्या बैठकीसाठी पटवून देण्यात यशस्वी झालो आणि मी देखील बैठकीला उपस्थित राहणार आहे.
पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीज राजा यांच्या कार्यकाळात, दोन मंडळांमधील तणाव वाढला, विशेषत: सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये प्रस्तावित २०२३ आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणावरून. तथापि, ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयच्या बैठकीनंतर लगेचच, एसीसी अध्यक्ष जय शाह यांनी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये जाणार नाही आणि आशिया चषक इतरत्र आयोजित करण्यात येईल अशी घोषणा केली.
२००८ पासून टीम इंडिया पाकिस्तानला गेलेली नाही
यावर पाकिस्तानच्या बाजूने हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगण्यात आले. आशिया चषक पाकिस्तानात न झाल्यास पाकिस्तानी संघ विश्वचषक स्पर्धेसाठी भारत दौऱ्यावर येणार नाही, असेही सांगण्यात आले. वास्तविक, यावेळी पाकिस्तान हा आशिया चषक स्पर्धेचा यजमान देश आहे. मात्र, बैठकीनंतरच आशिया चषक कुठे खेळवला जाणार हे निश्चित होणार आहे. भारतीय पुरुष संघाने २००८ पासून पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळलेला नाही, तर पाकिस्तानने शेवटचा टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी २०१६ मध्ये भारताचा दौरा केला होता.