Asia Cup out of Pakistan: सध्या भारतात आयपीएल सुरु आहे पण संपूर्ण दिवसभर आशिया चषकाचीच चर्चा होती. त्यामुळे आजचा दिवस हा आशिया चषक २०२३च्या नावावर राहिला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. अशा स्थितीत तटस्थ स्थळाचा पर्याय समोर आला. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, आगामी आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ही स्पर्धा पाकिस्तानमधून हलवण्याच्या तयारीत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आशिया चषक २०२३ आता पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत हलवण्यात आला आहे. या वृत्तात असेही म्हटले आहे की, पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही. पाकिस्तानही या स्पर्धेवर बहिष्कार घालू शकतो. यावेळी आशिया चषक ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो खुली असून तो कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
Ranji Trophy 2025 Rohit Sharma suffers twin failure on Ranji return gets out for 28 in 2nd innings Mum vs JK match
Ranji Trophy 2025 : रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या सलग दुसऱ्या डावात अपयशी, हिटमॅनचा झेलबाद झाल्याचा VIDEO व्हायरल
Pakistan Logo On Champions Trophy Jersey
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय जर्सीवर पाकिस्तानचे नाव… आधी नकार, मग होकार! नक्की प्रकरण काय?
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदविकाराचा झटका; प्रशासनाच्या तयारीमुळे वाचले प्राण
ICC Responds As BCCI Says No To Pakistan Name Written On Team India Champions Trophy Jersey
Champions Trophy: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार की नाही? ICC ने स्पष्टच सांगितलं
Champions Trophy 2025 No Pakistan Name on Team India CT Jersey PCB Official Slam BCCI
Champions Trophy: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जर्सीवर पाकिस्तानचं नाव नसणार? PCBच्या अधिकाऱ्यांनी BCCIला सुनावलं

हेही वाचा: MS Dhoni on Virat: खुद्द थाला CSK कॅम्पमध्ये RCB सुपरस्टारची फलंदाजी शैली उलगडतो तेव्हा, पाहा Video

या दोन ठिकाणी स्पर्धा खेळवता येतील

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एसीसीच्या अहवालात असेही समोर आले आहे की, जर आशिया चषक २०२३ श्रीलंकेत गेला तर तो डांबुला आणि पल्ल्लेकल्ले येथे आयोजित केला जाऊ शकतो. कोलंबोमध्ये सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा हंगाम असतो. त्यामुळे ही दोन शहरे फायनल होऊ शकतात. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आला तर सहा देशांची स्पर्धा होईल. अन्यथा ते भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या पाच देशांमध्ये होऊ शकते. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेवर बहिष्कार घातला तर २०२३ च्या विश्वचषकात सहभागी होणार की नाही यावरही संभ्रम निर्माण झाला आहे.

काय होता संपूर्ण वाद?

वास्तविक संपूर्ण प्रकरण असे आहे की, आशिया चषकाचे आयोजन यावेळेस पाकिस्तानमध्ये होणार होते. त्यांना आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी२० विश्वचषक २०२२ दरम्यान पाकिस्तानला भेट देण्यास नकार दिला. यानंतर हा वाद वाढला. पीसीबीचे तत्कालीन प्रमुख रमीझ राजा यांनीही २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात न येण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये सत्तापरिवर्तन झाले आणि नजम सेठी आले. तटस्थ ठिकाणी ही स्पर्धा होऊ नये यासाठीही त्यांनी आग्रह धरला. यानंतर, पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलबद्दल पर्याय सुचवला, ज्या अंतर्गत भारताविरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी आणि उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होईल. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) हेही फेटाळले होते. इथून वाद आणखीनच वाढला.

हेही वाचा: IPL 2023: “जर दुखापती कमी करायच्या असतील तर तुम्हाला…”, WTC फायनलपूर्वी वसीम अक्रमचा भारतीय गोलंदाजांना महत्त्वाचा सल्ला

पाकिस्तानने ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याचा निर्धार केला होता. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणांमुळे आणि राजकीय मतभेदांमुळे भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करू शकत नाही. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. भारतीय बोर्डानेही पाच देशांदरम्यान एकदिवसीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. आता आलेल्या अहवालानुसार पाकिस्तान बहिष्कार घालणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच या स्पर्धेत फक्त पाच देश सहभागी होऊ शकतात. सध्या याबाबत बोर्ड आणि एसीसी या दोघांकडूनही घोषणेची प्रतीक्षा आहे.

Story img Loader