Babar Azam surpasses Virat Hashim: आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने धडाकेबाज शतक झळकावले. बाबरने नेपाळविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १९ वे शतक झळकावले. बाबरने १५१ धावा केल्या. त्याने १३१ चेंडूंच्या खेळीत १४ चौकार आणि चार षटकार मारले. त्याने शतक झळकावून अनेक विक्रम केले आहेत. विशेष म्हणजे त्याने ब्रायन लाराच्या एक खास विक्रमाशी बरोबरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १९ शतके करणारा तो खेळाडू ठरला. या प्रकरणात बाबरने दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी सलामीवीर हाशिम आमला आणि भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली यांना मागे टाकले आहे. बाबरने कारकिर्दीतील १०२ व्या डावात १९वे शतक झळकावले. अमलाने यासाठी १०४ डाव खेळले होते. कोहलीने १९ शतकांसाठी १२४ डाव खेळले होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने १३९ डावात ही कामगिरी केली.

लारा, जयवर्धने आणि वॉर्नरच्या विक्रमाशी केली बरोबरी –

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत बाबरने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या सर्वांच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९-१९ शतके आहेत. जयवर्धनेने ४४८, ब्रायन लाराने २९९ आणि डेव्हिड वॉर्नरने १४२ सामन्यात १९ शतके झळकावली. त्याचवेळी बाबरने केवळ १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची बरोबरी केली.

हेही वाचा – PAK vs NEP: बाबर आझमची कॅप्टन इनिंग! Asia Cup 2023चे झळकावले पहिले शतक, सईद अनवरचा रेकॉर्ड धोक्यात

सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत बाबरने न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क वॉ यांना मागे टाकले. मार्क वॉने २४४ आणि गुप्टिलने १९८ सामन्यात १८-१८ शतके झळकावली आहेत. बाबर सईद अन्वरच्या जवळ पोहोचला. पाकिस्तानसाठी सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत बाबर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे फक्त माजी सलामीवीर सईद अन्वर आहे. अन्वरच्या नावावर २४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २० शतके आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 babar azam became the second highest odi century scorer for pakistan vbm
Show comments