Asia Cup 2023 Bangladesh vs Sri Lanka ODI Match Updates: आशिया चषक २०२३ स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधला हा सामना कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रि–केट स्टेडियमवर खेळला होत आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने नजमुल हुसेन शांतोच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४२.४ षटकांत सर्वबाद १६१ धावा केल्या. त्याचबरोबर श्रीलंकेकडून मथीशा पथिरानाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशने श्रीलंकेला १६५ धावांचे सोपे लक्ष्य दिले. नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशी संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि ४२.४ षटकांत १६४ धावांवर आटोपला. बांगलादेशसाठी नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक अधिक धावा केल्या. नजमुलने १२२ चेंडूत ८९ धावांची खेळी खेळली. अवघ्या ११ धावांनी त्याचे शतक हुकले.

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दडपण निर्माण करत बांगलादेशचा डाव गुंडाळला –

९५ धावांवर ४ विकेट्स गमावलेल्या बांगलादेशच्या डावाला शांतोच्या साथीने मुशफिकुर रहीमने नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही १३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दडपण कायम ठेवले आणि बांगलादेशचा डाव गुंडाळण्यास फारसा वेळ लागला नाही.

नजमुलशिवाय एकही फलंदाज फार काळ क्रीजवर टिकू शकला नाही. तौहीद हृदयने २०, मोहम्मद नईमने १६ आणि मुशफिकर रहीमने १३ धावा केल्या. या चौघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मथीशा पाथिरानाने चार विकेट्स घेतल्या. महिष तेक्षानाने दोन गडी बाद केले. धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलालगे आणि दासुन शानाका यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), ड्युनिथ वेल्स, महिश टीक्षाना, कसून राजिथा, मथीशा पाथिराना.

बांगलादेश: मोहम्मद नईम, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदय, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, मेहिदी हसन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 ban vs sl odi match bangladesh set a target of 165 runs against sri lanka vbm
Show comments