Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ची तारीख हळूहळू जवळ येत आहे, परंतु भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरू असलेला वाद अद्याप मिटलेला नाही. हा वाद मिटवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असून एका अहवालानुसार भारत हायब्रीड मॉडेलसह आशिया कप खेळण्यास तयार आहे, मात्र यासाठी बीसीसीआयने पीसीबीसमोर नवी अट ठेवली आहे. या वर्षी भारतात खेळल्या जाणार्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ नक्कीच येईल, असे पीसीबीने लिखित स्वरूपात द्यावे, अशी बीसीसीआयची इच्छा आहे यामुळे पाकिस्तानची गोची झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
CricketPakistan.com नुसार, बीसीसीआय आशिया चषकाबाबत आपली भूमिका मवाळ करण्यास तयार आहे. यापूर्वी बीसीसीआयने संपूर्ण आशिया चषक पाकिस्तानबाहेर तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावा अशी मागणी केली होती, परंतु पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी देताच बीसीसीआयने आपली भूमिका बदलली.
मात्र आशिया चषक कसा खेळवला जाईल याबाबत कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नसून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एसीसीच्या निर्णयाची वाट पाहत आहे. दुसरीकडे, बीसीसीआयची २७ मे रोजी विशेष सर्वसाधारण बैठक होणार असून त्यात सर्व गोष्टींवर चर्चा होणार असून त्यानंतरच भारताचा निर्णय कळणार आहे. या बैठकीनंतर एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे वेळापत्रकही जाहीर केले जाऊ शकते.
भारताने संपूर्ण आशिया चषक इतरत्र आयोजित करण्यात यावे, असे सांगितले होते, परंतु पाकिस्तानने यासाठी हायब्रीड मॉडेलची चर्चा केली. आता नवीन हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात भारत वगळता सर्व देश पाकिस्तानमध्ये जाऊन चार सामने खेळतील, तर दुसऱ्या सामन्यात ते भारतीय संघासोबत तटस्थ ठिकाणी खेळतील. समोर आलेल्या अहवालानुसार, यूएई किंवा श्रीलंका ही दोन ठिकाणे असू शकतात, परंतु श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की, यूएईमध्ये खूप उष्णता आहे, अशा स्थितीत श्रीलंका हा उत्तम पर्याय आहे.
टीम इंडियाच्या सामन्यांसाठी श्रीलंका हे तटस्थ ठिकाण असू शकते
आशिया चषक स्पर्धेतील भारताचे सामने श्रीलंकेत खेळवले जाऊ शकतात आणि पाकिस्तान आपले सामने मायदेशात खेळणार असल्याचे कळते. लीग स्टेजनंतर, भारतीय संघ सुपर ४ मध्ये श्रीलंकेतही आपले सामने खेळणार आहे आणि जर टीम इंडियाचे स्थान अंतिम फेरीत निश्चित झाले तर तेही फक्त श्रीलंकेतच खेळले जाईल. या संपूर्ण प्रकरणाबाबत बीसीसीआय किंवा पीसीबीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नसले तरी लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते असे मानले जात आहे.
येत्या काही दिवसांत जय शहा यांच्या अध्यक्षतेखाली एसीसीची बैठक होणार असून, त्यात एकमत झाल्यास घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर होईल. आशिया चषकावर अंतिम शिक्कामोर्तब झाले तर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. एकदा हे दोघे लीगमध्ये भिडतील, त्यानंतर जर दोन्ही संघ जिंकले तर सुपर ४ मध्येही सामना होऊ शकतो, तर फायनलमध्येही या दोन संघांमध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे.