Asia Cup 2023: आशिया चषक २०२३च्या आधी श्रीलंका आणि बांगलादेशला ला मोठा धक्का बसला आहे. कारण, श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा खांद्याच्या दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा इबाबत हुसैन याला देखील दुखापतीमुळे आशिया चषकातून माघार घ्यावी लागली आहे.  दुष्मंता चमीराला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्याला लंका प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान ही दुखापत झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार असेही म्हटले आहे की, “एलपीएलच्या आधी, तो त्याच्या घोट्याच्या दुखापतीतून बरा झाला होता. त्याने विश्वचषकासाठी तंदुरुस्त व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि म्हणूनच त्याला आशिया कप संघातून वगळण्यात आले आहे. जर तो खांद्याच्या दुखापतीतून बरा होऊन गोलंदाजी करू शकला तर त्याचा विश्वचषकासाठी विचार केला जाईल.”

वानिंदू हसरंगा, ज्याचे नाव क्रीडा मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवले आहे, तो फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर  त्याच्याबाबतीत निर्णय घेतला जाईल. हसरंगाच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेने हसरंगाला आशिया कपसाठी संभाव्य संघात स्थान दिले नाही. त्याने अगोदरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: रोहित-विराट यांच्यासह ‘या’ खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट, आशिया चषकाआधी NCAचा मोठा निर्णय

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुखापतग्रस्त

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन मंगळवारी गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला. इबादतचा १० दिवसांपूर्वी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ जणांच्या संघात समावेश करण्यात आला होता पण तो निर्धारित वेळेत दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला होता.

इबादत हुसेनच्या जागी २० वर्षीय नवा वेगवान गोलंदाज तंजीम हसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी २९ वर्षीय खेळाडू वेळेत तंदुरुस्त होईल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य फिजिओ डॉ. देवाशिष चौधरी म्हणाले, “इबादत सहा आठवड्यांपासून दुखापतीतून बरे होण्यासाठी प्रयत्न करत आहे. या काळात आम्ही त्याचे अनेक वेळा एमआरआय केले पण, तो अजूनही दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे आम्ही त्याच्याबाबतीत कुठलीही घाई करणार नाही.”

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; भारताला टीम कॉम्बिनेशन निवडण्याची शेवटची संधी

आशिया चषक २०२३ साठी श्रीलंकेचा संभाव्य संघ: दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा (डब्ल्यूके), कुसल मेंडिस, चारिथ असलंका, सदीरा समरविक्रमा, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश थिसांग, महेश थिसांग, लाहिरु कुमार

आशिया चषक २०२३ साठी बांगलादेशचा संभाव्य संघ: शाकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झीद तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शेख महेदी, नसुम अहमद, शमीम हुसेन, अफिफुल इस्लाम, शमीम हुसेन, आफिफ हुसैन. मोहम्मद नईम, तंजीम हसन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 big blow to sri lanka and bangladesh before the asia cup these two players out of the series due to injuries avw
Show comments