Asia Cup 2023 matches: कँडी येथील भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे वाहून गेल्याने रद्द करावा लागला. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे स्पर्धेतील उर्वरित सामनेही येथून हलवले जाऊ शकतात. श्रीलंकेत, कोलंबोमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे, दुसरीकडे कॅंडीमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत सुपर-४ टप्प्यातील सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधून हलवले जाऊ शकतात.

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, आशियाई क्रिकेट परिषद आशिया कपच्या सुपर-४ टप्प्यातील सामन्यांचे ठिकाण बदलण्याचा विचार करत आहे. त्याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. एसीसीचे अध्यक्ष जय शाह सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोलंबोतील बिघडलेल्या हवामानाची माहिती सर्व संघांना देण्यात आली आहे. त्याच वेळी, डांबुला आणि पल्लेकेले येथे सामने हलवण्याचा विचार केला जात आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO

आशिया चषक स्पर्धेत सध्या ग्रुप स्टेजचे सामने सुरू असून या टप्प्यातील अजून दोन सामने बाकी आहेत. यापैकी एकही सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार नाही. सुपर-४ टप्प्यातील सामने कोलंबोमध्ये होणार होते, मात्र पुढील कधी दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत एसीसी लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकते.

भारताचा सामना पुन्हा रद्द होणार का? पाकिस्तानपाठोपाठ आता नेपाळविरुद्धच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात कॅंडी येथील पल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ‘अ’ गटातील हा सामना भारतासाठी करो या मरो असा आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध एका गुणावर समाधान मानावे लागले होते. कँडीमध्ये पावसामुळे पाकिस्तानचा डाव पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यामुळे सामना रद्द घोषित करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. पाकिस्तानचा संघ दोन सामन्यांत तीन गुणांसह सुपर-४ मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा: BAB vs AFG:  मेहदी हसन-नजमुल शांतोची तुफानी शतके! बांगलादेशचे अफगानिस्तानसमोर ३३५ धावांचे डोंगराएवढे आव्हान

पाकिस्तानविरुद्ध इशान किशन आणि हार्दिक पांड्या वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाची नेपाळविरुद्ध जोरदार पुनरागमनाची नजर आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा २३८ धावांनी पराभव केला होता. अशा स्थितीत भारताचा सामना करणे त्याच्यासाठी सोपे नसेल. मात्र, या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी आलेली नाही. पुन्हा एकदा पावसामुळे टीम इंडियाच्या सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.

हवामानाचा अंदाज काय आहे?

सोमवारी सकाळी पल्लेकेलमध्ये पावसाची सुमारे ६० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना ओले आउटफिल्ड दिसू शकते. मात्र, नाणेफेकीच्या वेळी (भारतीय वेळेनुसार २:३० वाजता) पावसाची शक्यता २२ टक्के आहे आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत परिस्थिती तशीच राहील. खेळाच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता ६६ टक्के असेल. अशा स्थितीत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामन्याप्रमाणेच अर्धा सामना पाहायला मिळू शकतो.

हेही वाचा: IND vs PAK: “फालतू कारण देत BCCIने…”, भारत-पाक सामना पावसामुळे रद्द अन् माजी पीसीबी प्रमुख नजम सेठी संतापले

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द झाला असून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. यासह पाकिस्तानचे दोन सामन्यांत एकूण तीन गुण झाले आहेत. यापूर्वी नेपाळविरुद्धचा पहिला सामना जिंकून त्यांना दोन गुण मिळाले होते. ते सुपर फोरसाठी पात्र ठरले आहेत. भारताकडे आता एक गुण आहे आणि सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या पुढील सामन्यात नेपाळला पराभूत करणे आवश्यक आहे. त्यांच्याविरुद्धचा सामना जरी पावसामुळे रद्द झाला तरी भारत पुढील फेरीसाठी पात्र होईल. कारण, भारताचे अशा परिस्थितीत दोन गुण होतील आणि नेपाळला एक गुण मिळेल. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पुढील फेरीसाठी पुढे जातील आणि नेपाळचा प्रवास येथे संपेल. मात्र, जर नेपाळने भारताला हरवले तर मग नेपाळ पुढील फेरीसाठी पात्र होईल आणि भारत आशिया चषकातून बाहेर पडेल.

Story img Loader