KL Rahul Comeback : श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यातील पहिल्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान आहे. हा सामना १० सप्टेंबर (रविवार) रोजी खेळवला जाणार होता, परंतु, त्या दिवशी पावसामुळे सामना होऊ शकला नाही. परिणामी हा सामना आज (११ सप्टेंबर) राखीव दिवशी खेळवला जात आहे. रविवारी हा सामना पावसामुळे थांबवण्यात आला तेव्हा भारताने २४.१ षटकांत २ गड्यांच्या बदल्यात १४७ धावा जमवल्या होत्या. भारताचे दोन्ही सलामीवीर बाद होऊन लोकेश राहुल आणि विराट कोहली खेळपट्टीवर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने आज २ बाद १४७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. विराट कोहली ८ आणि केएल राहुल १७ धावांवर नाबाद होते. दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेल्या केएल राहुलने हळूहळू आपल्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. राहुलने सुरुवातीच्या काही वेळात संथ गतीने धावा जमवल्या. दुखापतीमुळे ४ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली आहे. राहुलने ६० चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं.

अर्धशतक पूर्ण केल्यानंतर राहुलने गिअर बदलला आणि काही अक्रमक फटके लगावले. राहुलने ३५ व्या षटकात शादाब खानच्या गोलंदाजीवर मिड विकेटवरून एक उत्तुंग षटकार लगावला. हा षटकार पाहून स्टेडियममधील भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला. राहुलचा हा फटका इतका सुंदर होता की, पव्हेलियनमध्ये बसलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने डोक्याला हात लावला. तसेच नॉन स्ट्राईकर एंडला उभ्या असलेल्या विराट कोहलीने राहुलला दाद देली. राहुलच्या षटकारावरील विराट आणि रोहितची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

हे ही वाचा >> “सचिन तेंडुलकरमध्ये बॉलिंगचा कीडा..”, रवी शास्त्रींचं विधान; क्रिकेटच्या देवाचा विकेट्सचा रेकॉर्ड वाचा

या सामन्यात आतापर्यंत भारताने ४४ षटकात दोन बाद २८६ धावा जमवल्या आहेत. राहुल ९२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८४ धावा फटकावल्या आहेत. तर विराट कोहलीने ७२ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकराच्या मदतीने ८२ धावा जमवल्या आहेत.