India vs Pakistan Match रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे भारताच्या आघाडीच्या फळीतील गुणवान फलंदाज विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ हे तेजतर्रार मारा करणारे पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज.. या जागतिक दर्जाच्या खेळाडूंमधील द्वंद्व आज, शनिवारी होणाऱ्या आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील सामन्यात पाहायला मिळणार आहे.

भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून आशिया चषक स्पर्धेकडे पाहिले जात आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान हे तणावपूर्ण संबंध असलेले शेजारी देश आमनेसामने आल्यावर या लढतीला वेगळेच महत्त्व प्राप्त होते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या लढतीत कोहलीने अविस्मरणीय खेळी करताना भरगच्च असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) भारताला एकहाती विजय मिळवून दिला होता. या खेळीदरम्यान कोहलीने हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर समोरील दिशेने मारलेला ‘तो’ षटकार आजही प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या लक्षात आहे. कोहलीने या खेळीसह आपल्यातील असाधारण गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली होती. आता अशीच कामगिरी करण्यासाठी रोहित आणि गिलही उत्सुक असतील.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण

हेही वाचा >>> Asia Cup 2023: भारत-पाक सामन्यापूर्वी विराट कोहली आणि हरिस रौफने घेतली एकमेकांची भेट, VIDEO होतोय व्हायरल

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना म्हणजे दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी दमदार कामगिरी करून स्वत:चे नाव आपापल्या देशांच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्याची एक संधी असते. राजकीय तणावामुळे या शेजारी देशांमध्ये आता द्विदेशीय मालिका खेळवल्या जात नाही. हे संघ केवळ ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धा किंवा आशिया चषकासारख्या खंडीय स्पर्धामध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळे या सामन्यांत विजय मिळवण्याचे, चाहत्यांच्या अपेक्षांचे खेळाडूंवर दडपण असते. हे दडपण अधिक चांगल्या प्रकारे हाताळणाऱ्या संघालाच आजही विजयाची सर्वोत्तम संधी असेल.

बाबर, गोलंदाजांवर भिस्त

पाकिस्तानला विजय मिळवायचा झाल्यास कर्णधार बाबर आझमला पुन्हा आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आशिया चषकातील पहिल्या सामन्यात नेपाळविरुद्ध पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. त्या वेळी बाबरने १५१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याला इफ्तिखार अहमद (नाबाद १०९) आणि मोहम्मद रिझवान (४४) यांची साथ लाभली होती. या तिघांचा लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तानची मुख्यत: गोलंदाजांवर भिस्त असेल. शाहीन, नसीम आणि रौफ हे त्रिकूट सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. या तिघांनी मिळून या वर्षी ४९ गडी बाद केले आहेत. त्यांच्यापासून भारताला सावध राहावे लागेल. तसेच लेग-स्पिनर शादाब खानही लयीत आहे. 

हेही वाचा >>> IND vs PAK: पावसाने व्यत्यय आणल्यास किती षटकांचा खेळ होणे आवश्यक? DLS नियम कधी लागू होणार, जाणून घ्या सर्व काही

अय्यर, बुमरावर लक्ष

रोहित आणि गिल भारताच्या डावाची सुरुवात करणे अपेक्षित असून कोहली तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करण्याची शक्यता आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन मुख्य दावेदार आहेत. पाठीच्या दुखापतीतून सावरून पुनरागमन करणारा श्रेयस दमदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल. किशनने यापूर्वी सलामीवीर म्हणून आपली सर्वोत्तम कामगिरी केली असली, तरी केएल राहुलच्या अनुपस्थितीत त्याला मधल्या फळीत खेळावे लागू शकेल. अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलूंवर असेल. तसेच त्यांना गोलंदाजीतही योगदान द्यावे लागेल. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसह जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि सिराज हे वेगवान त्रिकूट या सामन्यात खेळणे अपेक्षित आहे. अंतिम ११मध्ये स्थान मिळाल्यास बुमरा जुलै २०२२ नंतर आपला पहिला एकदिवसीय सामना खेळेल.

रोहित विरुद्ध शाहीन 

भारताचा कर्णधार रोहितची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याला चमक दाखवण्यात यश आले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध १६ एकदिवसीय सामन्यांत ५१.४२ची सरासरी आणि ८८.७७च्या स्ट्राइक रेटने ७२० धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु शाहीनविरुद्ध धावा करणे रोहितला यापूर्वी अवघड गेले आहे. २०२१मध्ये अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यात शाहीनने पहिल्याच चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून रोहितला पायचीत पकडले होते. सुरुवातीच्या षटकांत रोहितचे पदलालित्य तितकेसे आश्वासक नसते आणि याच वेळी ‘इन स्विंग’ करणारा शाहीन त्याच्यासाठी घातक ठरू शकतो. मात्र, सुरुवातीची षटके खेळून काढल्यास रोहितला मोठी खेळी करता येऊ शकेल.

हेही वाचा >>> IND vs PAK: ‘आमच्याकडे शाहीन, नसीम आणि रौफ नाहीत, पण…’; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माच मोठं विधान

उत्साहावर पाणी?

भारत-पाकिस्तान लढत पालेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामनाही याच मैदानावर झाला होता. मात्र, भारत-पाकिस्तान लढत वेगळय़ा खेळपट्टीवर होणार आहे. या खेळपट्टीकडून गोलंदाजांना साहाय्य मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच शनिवारी पालेकेले येथे सकाळ ते दुपारच्या मध्यापर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरू होऊ शकेल.

आमनेसामने

(एकदिवसीय क्रिकेट)

* सामने : १३२

* भारत विजय : ५५

* पाकिस्तान विजय : ७३

* रद्द : ४ * वेळ : दुपारी ३ वा.  * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार

Story img Loader