Jay Shah on PCB: आशिया चषक २०२३चे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळले जात आहेत. भारतीय संघाने आशिया चषक २०२३चे अधिकृत यजमान असलेल्या पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने शेवटच्या क्षणी श्रीलंकेला सह-यजमान म्हणून जोडले. पण सध्या श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे ही स्पर्धा धोक्यात आली आहे. या सगळ्या दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी मोठा खुलासा केला आहे. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (UAE) ऐवजी श्रीलंकेत घेण्याचा निर्णय का घेण्यात आला हे त्यांनी सांगितले आहे. तसेच, त्यांनी पीसीबीला सडेतोड उत्तर देखील दिले आहे.

जय शाह यांनी माजी पीसीबी प्रमुख नजम सेठींना दिले प्रत्युत्तर

“आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी संयुक्त अरब अमिराती (UAE)च्या उष्णतेमध्ये वन डे खेळण्यास संघांची इच्छा नाही. तसेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) च्या शीर्षस्थानी दोन प्रमुख बदल्याने आशिया कपचे आयोजन करण्याच्या निर्णयामागे उशीर झाला,” असे त्यांनी सांगितले. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांच्या ताज्या विधानानंतर शाह यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. शाह म्हणाले की, “सुरुवातीला ACCचे सदस्य असलेले सर्व संघ, मीडिया हक्क धारक असे अनेक जण पाकिस्तानात आशिया चषकाच्या आयोजनासाठी तयार नव्हते. ही अनिश्चितता तुमच्या देशातील सुरक्षा आणि आर्थिक परिस्थितीशी संबंधित चिंतेमुळे उद्भवली आहे.”

kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”

हेही वाचा: PAK vs BAN: पाकिस्तानवर बांगला टायगर्स पडणार का भारी? शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

तत्पूर्वी, नजम सेठी म्हणाले होते की, “माझ्या कार्यकाळात मी २०२३ आशिया चषक श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये आयोजित करण्याची सूचना केली होती. कारण, त्या काळात श्रीलंकेच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो असे मी सांगितले होते. पावसाळ्याचे दिवस असताना तुम्ही तिथे एवढ्या चषकाचे आयोजन करू नये, असेही मी त्यावेळी सुचवले होते. मात्र, पाकिस्तानचे काहीही करून ऐकायचे नाही आणि खेळात राजकारण आणायचे एवढाच काय तो हेतू बीसीसीआय आणि एसीसीचा होता.”

यावर एसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले की, “आशिया चषक २०२२ टी२० फॉरमॅटमध्ये यूएईमध्ये खेळला गेला. येथे हे आवर्जून सांगणे महत्त्वाचे आहे की, टी२० स्पर्धेच्या परिस्थितीची १०० षटकांच्या (५०-५० षटकांच्या) एकदिवसीय स्वरूपाशी तुलना होऊ शकत नाही. खेळाडूंच्या प्रश्नांबाबत संघाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता, ज्यामध्ये वन डे सामने सप्टेंबर महिन्यात युएई मध्ये खेळण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. अशा वेळापत्रकामुळे खेळाडूंना थकवा येऊ शकतो आणि दुखापतीचा धोका वाढू शकतो, विशेषत: आयसीसी क्रिकेट विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी हा धोका कोणताही संघ पत्करू शकत नाही. कोणताच संघ तुमच्या देशात संपूर्ण आशिया कप खेळण्यास तयार नव्हता.”

हेही वाचा: Asia Cup 2023: मुथय्या मुरलीधरनचा भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला खोचक टोला; म्हणाला, “द्रविड महान फलंदाज, पण माझा चेंडू…”

शाह म्हणाले, “एसीसीचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांसाठी एक न्याय्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, जो सर्वांना मान्य आहे. मी, ACC व्यवस्थापनासह, PCB ने प्रस्तावित केलेले ‘हायब्रीड मॉडेल’ स्वीकारले. काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. तसेच, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की PCBच्या नेतृत्वात अनेक बदल झाले आणि यामुळे विशेषत: सामन्यांसाठी कर सूट आणि विमा यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींबाबत काही वाटाघाटी झाल्या.”

Story img Loader