PCB on Jay Shah: बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी लाहोरमधील अधिकृत कार्यक्रमापूर्वी आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज आहे. पीसीबीने बुधवारी लाहोरमध्ये आशिया कप ट्रॉफीच्या अनावरणासह वेळापत्रक जाहीर करण्यासाठी औपचारिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंशिवाय पीसीबीच्या क्रिकेट व्यवस्थापन समितीचे प्रमुख झका अश्रफही उपस्थित होते. मात्र, कार्यक्रम सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधीच जय शाह यांनी आशिया कपचे वेळापत्रक ट्वीटरवर जाहीर केले होते.

पीसीबीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “पीसीबीला आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजेच एससीसी या कार्यक्रमाची संपूर्ण कल्पना होती मात्र, तरीही त्यांनी अशी कृती केल्याने आम्ही नाराज झालो आहोत. लाहोरमध्ये समारंभ सुरू झाल्यानंतर ५ मिनिटांनंतर ते आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करणार होते. पण दुर्दैवाने, समारंभ सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी संध्याकाळी ७.१५ वाजता, जय शाह यांनी सोशल मीडियावर वेळापत्रक जाहीर केले. आम्ही फक्त आता नावापुरता यजमान राहिलो आहोत.”

kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Nana Patole
Nana Patole : नाना पटोलेंचा महायुतीवर आरोप; “महाराष्ट्रात लोकशाहीचा दिवसढवळ्या खून, आमची ७६ लाख मतं…”
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Mohammed Siraj Statement on Travis Head Sendoff Incident Said Its a lie that he said well bowled to me
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा: IND vs WI: किंग कोहलीचे कौतुक करताना वेस्ट इंडिजच्या प्रेक्षकांना शब्द पडले अपुरे! खुद्द BCCIलाही Video शेअर करण्याचा मोह आवरेना

जय शाहांनी आशिया चषकाचे वेळापत्रक लवकर जाहीर केल्यामुळे PCB नाराज

पीटीआयला पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जय शाहांनी आशिया चषकाचे वेळापत्रक लवकर जाहीर करण्याच्या निर्णयाने पीसीबीचे सर्व गणित बिघडले होते. कारण, वेळापत्रक आधीच जाहीर झाल्याने या कार्यक्रमाला काहीच अर्थ राहत नाही. आम्हाला करण्यासाठी काही शिल्लक ठेवणार कि फक्त नावापुरतेच यजमान आहोत.” या घटनेबाबत पीसीबीने एसीसीसमोर जाहीर नाराजी व्यक्त करत जय शाहांवर गंभीर आरोप केला आहे. मात्र, गैरसमजातून हे सर्व घडल्याचे एसीसीकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजमध्ये धमाल करताना भारतीय क्रिकेटर्स, सूर्यकुमार, संजू सॅमसन पोहोचले बीचवर, पाहा फोटो

जय शाहांनी पीसीबीचा दिले थेट उत्तर

सूत्राने सांगितले की, “एशियन क्रिकेट कौन्सिलचे स्पष्टीकरण वेळेतील फरक आणि गैरसमजाबद्दल होते, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की भारत पाकिस्तानपेक्षा अर्धा तास पुढे आहे, त्यामुळे जय शाह यांनी वेळापत्रक जाहीर करणे हा एक प्रकारचा धक्का होता, असे म्हणता येणार नाही.” बोर्डातील आणखी एका सूत्राने सांगितले की, “पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी डरबनमध्ये आयसीसीच्या वार्षिक बैठकीदरम्यान शाह आणि झका अश्रफ यांच्यातील बैठक ज्या अव्यावसायिक पद्धतीने हाताळली होती, त्याचा राग म्हणून जय शाहांनी वेळापत्रक लवकर जाहीर करत पीसीबीला थेट उत्तर दिले.

खरे तर या बैठकीनंतर पाकिस्तानी मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की, जय शाह यांनी पीसीबी अध्यक्षांचे निमंत्रण स्वीकारले असून ते आशिया चषकादरम्यान पाकिस्तानला जाणार आहेत, मात्र जय शाहांनी ते साफ धुडकावून लावले. आशिया चषकाला ३१ ऑगस्टपासून मुलतान येथे सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा सामना नेपाळशी होणार आहे. त्याच वेळी, भारत-पाकिस्तान सामना २ सप्टेंबर रोजी कॅंडीमध्ये होणार आहे. पाकिस्तानमध्ये आशिया कपचे ४ सामने होणार आहेत.

Story img Loader