KL Rahul Wicketkeeping Practice: भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक२०२३ साठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी भारत सध्या बंगळुरूमध्ये सराव करत आहे. या सराव सत्राच्या तिसऱ्या दिवशी के.एल. राहुल विकेटकीपिंग करताना दिसला. या सराव सत्रात त्याने पहिल्यांदाच विकेटकीपिंग केली. यापूर्वी, त्याने फक्त दोन दिवस फलंदाजीचा सराव केला होता, दुसरीकडे स्टार फलंदाज विराट कोहली नेट्समध्ये फिरकीपटूंविरुद्ध जोरदार फटके खेळत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमाचे प्रसारण हक्क असलेल्या स्टार स्पोर्ट्सने तिसऱ्या दिवसाच्या सराव सत्राचा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये के.एल. राहुल पहिल्यांदाच विकेटकीपिंग करताना दिसत आहे. कोहली २ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी सराव करताना दिसला.

भारत आशिया चषक २०२३मध्ये २ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. कारण भारतासह पाकिस्तानने या स्पर्धेसाठी आपल्या संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश केला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजल्यापासून पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमधील हा महामुकाबला खेळवला जाईल.

के.एल. राहुलला आयपीएल २०२३ दरम्यान दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तो एनसीएमध्ये रिहॅब करत होता आणि आशिया कपसाठी त्याची निवड झाली. त्याच्याबद्दल असे म्हटले जात होते की तो आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये क्वचितच खेळेल, परंतु तो ज्याप्रकारे सराव करत आहे त्यावरून असे दिसते आहे की पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होऊन प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतो.

हेही वाचा: IND vs PAK: के.एल.राहुलबाबत माजी प्रशिक्षक संजय बांगरचे सूचक विधान; म्हणाला, “संघात एकाच अटीवर…”

आशिया चषक ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे होणार आहे. सलामीच्या सामन्यासह एकूण ४ सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, इतर सामने श्रीलंकेत होतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला भेट देण्याचे आमंत्रण पाठवले होते. चेअरमन रॉजर बिन्नी आणि व्हाईस चेअरमन राजीव शुक्ला यांनी तो स्वीकारला आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारले आहे. वृत्तानुसार, तो पाकिस्तानमध्ये होणारे सामनेही पाहणार आहे. पीटीआयने एका सूत्राचा हवाला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, बीसीसीआयचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव जय शाह २ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहतील. यानंतर बिन्नी आणि राजीव पाकिस्तानला जाणार आहेत.

हेही वाचा: Asia Cup 2023: लष्करापासून ते पाकिस्तानी रेंजर्सपर्यंत कशी असेल आशिया कप २०२३ची सुरक्षा व्यवस्था? जाणून घ्या

आशिया कप २०२३ साठी भारतीय संघाचा संघ

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 kl rahul started wicketkeeping virat kohli also hit big shots watch video avw
Show comments