Asia Cup 2023; when, where, how to watch: आशिया चषक २०२३ हा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाईल. आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे ६ संघ सहभागी होत आहेत. ही स्पर्धा प्रथमच पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवली जाणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये ४ सामने आणि श्रीलंकेत ९ सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत अंतिम फेरीसह एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.

आशिया चषक २०२३चा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी मुलतान येथे पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. भारत आशिया चषक मोहिमेची सुरुवात २ सप्टेंबर रोजी कँडी येथे पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. यानंतर टीम इंडिया ४ सप्टेंबरला नेपाळविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. ६ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून त्यात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ यांना एका गटात तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांना दुसऱ्या गटात ठेवण्यात आले आहे.

आशिया कप २०२३चे ऑनलाईन थेट प्रसारण कधी, कुठे आणि कसे पाहू शकता?

स्टार स्पोर्ट्सने आशिया कप २०२३ सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले आहेत. स्टार स्पोर्ट्सने भारत आणि श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि भूतान या शेजारील देशांमधील आशिया कप सामन्यांचे प्रसारण हक्क विकत घेतले आहेत.

आशिया कप २०२३च्या सर्व सामन्यांचे थेट प्रेक्षेपण डिस्ने + हॉटस्टार प्लॅटफॉर्मवर अ‍ॅप आणि वेबसाइटवरून उपलब्ध असेल. आशिया कप २०२३चे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर प्रसारित केले जातील स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 HD. तसेच, प्रादेशिक भाषांमध्ये देखील स्टार स्पोर्ट्स तमिळ, मराठी, गुजराती आणि बंगाली इथे देखील पाहू शकता.

हेही वाचा: Team India: आशिया चषकापूर्वी कोहली- रोहितची तुफान फटकेबाजी, टीम इंडियाचा कसून सराव, पाहा Video

आशिया कप २०२३चे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहू शकता?

आशिया कप २०२३च्या सर्व सामन्यांचे थेट प्रवाह Disney + Hotstar वर पाहता येईल. आशिया कप २०२३चे सर्व सामने मोबाईलवर मोफत पाहता येतील. अलीकडे, डिस्ने + हॉटस्टारने सर्व यूजरकर्त्यांसाठी आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेचे सर्व सामने विनामूल्य प्रसारित करण्याची घोषणा केली.

हेही वाचा: Salman Butt: “भारत-पाकिस्तान विश्वचषकासाठी ड्रीम टीम नाहीत…”, असे का म्हणाला पाकचा माजी क्रिकेटपटू?

आशिया कप २०२३चे पूर्ण वेळापत्रक:

३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

३१ ऑगस्ट: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, पल्लेकेले, दुपारी १:०० वाजता (भारतीय वेळ)

२ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, दुपारी १:०० वाजता (भारतीय वेळ)

३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर, दुपारी १:३० वाजता (भारतीय वेळ)

४ सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ, पल्लेकेले, दुपारी १:०० वाजता (भारतीय वेळ)

५ सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळ)

६ सप्टेंबर: A1 वि B2, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळ)

९ सप्टेंबर: B1 वि B2, कोलंबो, दुपारी २:०० PM (भारतीय वेळेनुसार)

१० सप्टेंबर: A1 वि A2, कोलंबो, २:०० PM IST (भारतीय वेळेनुसार)

१२ सप्टेंबर: A2 vs B1, कोलंबो, २:०० PM IST (भारतीय वेळेनुसार)

१४ सप्टेंबर: A1 वि B1, कोलंबो, २:०० PM IST (भारतीय वेळेनुसार)

१५ सप्टेंबर: A2 vs B2, कोलंबो, २:०० PM IST (भारतीय वेळेनुसार)

१७ सप्टेंबर: TBC vs TBC, कोलंबो, २:०० PM IST (भारतीय वेळेनुसार)

Story img Loader