Harbhajan Singh on Yuzvendra Chahal: आशिया कप २०२३ साठी १७ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, संघ निवडीनंतर अनेक मोठे प्रश्न त्याबाबत निर्माण झाले आहेत. विशेषत: आशिया चषक स्पर्धेत फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची न झालेली निवड हा चर्चेचा विषय राहिला आहे. चहलची संघात निवड न झाल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने निवड समितीवर संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या टीम इंडियामध्ये युजवेंद्र चहलपेक्षा चांगला फिरकीपटू नाही, असे हरभजन सिंगचे मत आहे. तरीही त्याची आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड व्हायला हवी होती पण तसे झाले नाही. हरभजन सिंग त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मला वाटते की संघात एक गोष्टीची उणीव भासत आहे आणि ती म्हणजे युजवेंद्र चहलची अनुपस्थिती. एक लेग स्पिनर जो चेंडू स्विंग करू शकतो त्यालाच तुम्ही जर संघातून बाहेर काढले तर हा निर्णय घेणे म्हणजे सर्वसामान्यांच्या विचार करण्याच्या पलीकडे आहे. जर तुम्ही अस्सल फिरकीपटूंबद्दल बोलत असाल तर मला वाटत नाही की भारताकडे वन डे आणि टी२० फॉर्मेटमध्ये चहलपेक्षा चांगला फिरकी गोलंदाज दुसरा कोणी असेल. होय, त्याचे शेवटचे काही सामने चांगले राहिले नाहीत, पण त्यामुळे तो वाईट गोलंदाज ठरत नाही.”

हेही वाचा: प्रज्ञानंद विरुद्ध कार्लसन यांचा अंतिम सामना अनिर्णित; उद्या टायब्रेकर

भज्जी पुढे म्हणाला, “मला वाटते की संघात त्याची उपस्थिती आवश्यक होती, आशा आहे की त्याच्यासाठी संघाचे दरवाजे बंद होणार नाहीत. ही स्पर्धा भारतात असल्याने विश्वचषकासाठी त्याचा विचार करणे आवश्यक आहे. चहल हा सामना जिंकवून देणारा खेळाडू आहे. मी समजू शकतो की त्याचा फॉर्म चांगला नाही, म्हणून कदाचित तुम्ही त्याला विश्रांती दिली असेल. पण मला वाटते की, तो जर संघासोबत असता तर त्याचा आत्मविश्वास अबाधित राहिला असता. वगळल्यानंतर कोणताही खेळाडू परत येतो कारण, त्याच्यावर नेहमीच चांगली कामगिरी करण्याचे दडपण असते.”

मात्र, आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर भारतीय कर्णधाराच्या या वक्तव्यामुळे ज्या खेळाडूंची निवड झाली नाही, त्यांचे मनोबल नक्कीच वाढेल. रोहितने स्पष्टपणे सांगितले आहे की, दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत. रोहित शर्मा म्हणाला, “कोणताही दरवाजा कोणासाठीही बंद नसतो. कोणीही कधीही येऊ शकतो. जर आम्हाला वाटत असेल की आम्हाला विश्वचषकासाठी चहलची गरज आहे, तर आम्ही त्याला कसे समाविष्ट करू शकतो ते पाहू, तेच नियम वॉशी (वॉशिंग्टन सुंदर) किंवा अश्विनसाठीही आहेत.”

हेही वाचा: IND vs IRE 3rd T20: भारत-आयर्लंडच्या मालिकेत हे पहिल्यांदाच घडलं; अखेर साडेतीन तासानंतर झाला फैसला, जाणून घ्या

आशिया कप २०२३ साठी भारतीय संघ

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, के.एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा

स्टँडबाय खेळाडू: संजू सॅमसन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 no spinner is better than him harbhajan singh came in support of chahal targeted the selectors avw
Show comments