Pakistan Team Announced for Asia Cup 2023: आशिया चषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे. वास्तविक, आशिया कप २०२३ हा ३० ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळचे संघ ३० ऑगस्टला आमनेसामने असतील. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी दोन हात करतील. पाकिस्तानने तगडा संघ जाहीर करून टीम इंडियासमोर एक आव्हान उभे केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२३ साठी आपला संघ जाहीर केला आहे. पीसीबीने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पीसीबीने आशिया चषक तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी समान संघाची घोषणा केली आहे. हाच संघ २ सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेत भारतासमोर खेळणार आहे. वास्तविक, आशिया कप अंतर्गत फायनलसह एकूण १३ सामने होणार आहेत. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. यातील ४ सामने पाकिस्तानमध्ये होणार असून उर्वरित फायनलसह ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत.

Pakistan become 1st team to whitewash South Africa at home in ODI bilaterals PAK vs SA
PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Important decision taken during PM talks between India and Kuwait
भारत, कुवेत आता सामरिक भागीदार; पंतप्रधानांच्या चर्चेदरम्यान महत्त्वाचा निर्णय
Pakistan Beat South Africa by 80 Runs and Seal ODI Series
PAK vs SA: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गोंधळ आणि बंडाळ्या पण संघाची कमाल; आफ्रिकेला घरच्या मैदानावर दिला दणका
Jay Shah decisive role in the Champions Trophy final sport news
भारताचे सामने पाकिस्तानबाहेरच! चॅम्पियन्स करंडकाचा तिढा सुटला; २०२७ पर्यंतच्या स्पर्धा संमिश्र प्रारूपानुसार, जय शहांची निर्णायक भूमिका?
Suvendu Adhikari Contai Cooperative Bank polls
Suvendu Adhikari : तृणमूल काँग्रेसकडून घरच्या मैदानावर धुव्वा, सुवेंदु अधिकारी यांच्या अडचणी वाढणार?
Top Searches in Pakistan 2024 in Marathi
Top Searches in Pakistan 2024: पाकिस्तानमध्ये २०२४ या वर्षात गुगलवर सर्वाधिक शोधला गेलेला प्रश्न कोणता माहितीये? “मतदान केंद्र…”
google year in search for pakistan
Top Searches in Pakistan 2024: पाकिस्तान २०२४ मध्ये गुगलवर काय शोधत होता? वाचा गुगल सर्च रिपोर्टची सविस्तर यादी!

बाबरचा पाकिस्तानी संघ खूप मजबूत आहे

बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ ३० ऑगस्ट रोजी मुलतान येथे नेपाळविरुद्ध आशिया चषकात पहिला सामना खेळणार आहे. यानंतर संघ २ सप्टेंबरला भारताविरुद्ध खेळणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. यावेळी पाकिस्तानी संघात शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ आणि मोहम्मद वसीम ज्युनियरसारखे वेगवान गोलंदाज आहेत. दुसरीकडे, इमाम-उल-हक, बाबर आझम, सलमान अली आगा, मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद हारिस यांची फलंदाजी खूपच संतुलित दिसते. फिरकी विभागाची जबाबदारी शादाब खानच्या खांद्यावर असेल.

हेही वाचा: IND vs PAK: मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी नवे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह नऊ सामन्यांची तारीख बदलली

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ

अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दबदबा

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आशिया चषकाचे १५ हंगाम आले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने सर्वाधिक ७ वेळा (१९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८) विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो ६ वेळा (१९८६, १९९७, २००४, २००८, २०१४, २०२२) चॅम्पियन ठरला आहे. पाकिस्तानला केवळ दोनदा (२०००, २०१२) विजेतेपद मिळवता आले.

आशिया कप वेळापत्रक

३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान, ३१ ऑगस्ट: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी, २ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान – कॅंडी, ३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर, ४ सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी, ५ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर

हेही वाचा: Irfan Pathan: “अवघड तुम्ही करा, सोपं काम…”, तिलक वर्माच्या अर्धशतकावरून इरफान पठाण भडकला

सुपर-४ स्टेज शेड्यूल ६ सप्टेंबर

A1 वि B2 – लाहोर ९ सप्टेंबर: B1 वि B2 – कोलंबो (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असू शकते) १० सप्टेंबर: A1 वि A2 – कोलंबो (भारत विरुद्ध पाकिस्तान असू शकते) १२ सप्टेंबर: A2 वि B1 – कोलंबो १४ सप्टेंबर: A1 वि B1 – कोलंबो १५ सप्टेंबर: A2 विरुद्ध B2 – कोलंबो १७ सप्टेंबर: अंतिम – कोलंबो

Story img Loader