KL Rahul and Shreyas Iyer Comeback: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा संपुष्टात आल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आगामी आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघाच्या घोषणेकडे लागले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेबाबत के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर संघात पुनरागमन करताना दिसतील, अशी आशा सर्वजण व्यक्त करत आहेत. त्याचवेळी, वन डे वर्ल्डकपपूर्वी संघासमोर दोन मोठे यक्ष प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल? यष्टिरक्षक म्हणून कोणत्या खेळाडूला संधी मिळेल? अशा परिस्थितीत या दोन खेळाडूंच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठे विधान केले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, भारतीय संघाने सूर्यकुमार यादवला क्रमांक-४ स्थानावर संधी दिली, परंतु तो एकदाही ४० धावांचा टप्पा पार करू शकला नाही. त्याचवेळी संजू सॅमसनने फक्त एक अर्धशतक केले बाकी सर्व सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला. यानंतरच्या टी२० मालिकेतही त्याची अत्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
ulta chashma
उलटा चष्मा : रम्य ‘ती अडीच वर्षे’
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजकडून लाजिरवाण्या पराभवानंतर व्यंकटेश प्रसाद टीम इंडियावर भडकला; म्हणाले, “फालतू कारणे…”

आता प्रशिक्षक राहुल द्रविडने वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी२० मालिका ३-२ने गमावल्यानंतर, के.एल. राहुल आणि अय्यर आशिया कपमध्ये पुनरागमन करताना दिसतील, असे संकेत दिले. “विश्वचषकातील आमचा संघ यापेक्षा खूप वेगळा असेल,” असे द्रविडने सांगितले. पुढे द्रविड म्हणाला की, “या दौऱ्यात संघात आम्हाला अधिक पर्याय वापरण्याची संधी मिळाली नाही. येणाऱ्या काळात आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजी यावर लक्ष द्यायचे आहे, जिथे आपण अधिक चांगले करू शकतो. आम्हाला फलंदाजीत अधिक सखोलता हवी आहे, पण त्याचबरोबर गोलंदाजी कमकुवत होऊ द्यायची नाही, यासाठी आंम्ही अष्टपैलू खेळाडू शोधत आहोत.”

के.एल. राहुलचे पुनरागमन जवळपास निश्चित आहे

आयपीएलच्या १६व्या मोसमात दुखापत झाल्यानंतर मैदानाबाहेर गेलेल्या के.एल. राहुलने जवळपास पूर्ण तंदुरस्त झाला आहे. याचा अंदाज राहुलच्या एनसीएमधील सराव व्हिडीओवरून वर्तवला जात आहे. यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेत तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पुनरागमन करेल अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: BCCI Blue Tick: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर BCCI ने काय केलं की ज्यामुळे ट्विटरवरील ब्लू टिक गमावली?

२३ ऑगस्टपासून बंगळुरूमध्ये सराव शिबिर सुरू होणार आहे

आशिया कप आणि विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे लक्ष आता एकदिवसीय क्रिकेटवर असेल. जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यासह दुखापतग्रस्त खेळाडूंना आशिया कपमध्ये संधी दिली जाऊ शकते, असे द्रविडने संकेत दिले. “आमचे काही खेळाडू दुखापतीतून बरे होऊन पुनरागमन करत आहेत. आम्हाला त्यांना आशिया चषकात संधी द्यावी लागेल. आशिया चषक स्पर्धेसाठी आमचा एक आठवडाभराचा शिबिर २३ ऑगस्टपासून बंगळुरू येथे सुरू होणार आहे. आम्ही त्यानंतर विश्वचषकासंदर्भात निर्णय घेऊ.”

Story img Loader