IND vs SL Asia Cup Final: आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, या महामुकाबल्या पूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा स्टार स्पिनर महेश तिक्षणा क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला आणि त्याने पुन्हा गोलंदाजीही केली नाही. आता तो गोलंदाज अंतिम फेरीत खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. याचा अर्थ टीम इंडियाच्या आशियाई चॅम्पियन होण्याच्या मार्गातून मोठे संकट दूर झाले असे दिसत आहे.

श्रीलंकन संघाचा सर्वोत्तम गोलंदाज महेश तिक्षणा दुखापतग्रस्त झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान महेशला दुखापत झाली होती. सामन्यादरम्यान तो अनेकवेळा मैदानाबाहेर गेला होता. सध्या त्यांच्याबद्दल कोणतेही नवीन अपडेट प्राप्त झालेले नाही. मात्र, फायनलपूर्वी श्रीलंकेला हा मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा: IND vs BAN, Asia Cup: शाकिब-तौहीदची झुंजार खेळी! बांगलादेशचे टीम इंडियासमोर २६६ धावांचे आव्हान

वास्तविक हा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोमध्ये खेळला गेला होता. श्रीलंकेने शानदार कामगिरी करत हा सामना जिंकला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा गोलंदाज तिक्षणा जखमी झाला. या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिक्षणाने आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या आहेत. तो श्रीलंकेच्या गोलंदाजी आक्रमणाचा एक मजबूत भाग आहे. तिक्षणा अंतिम फेरीत खेळण्याबाबत शाशंकता असून तो बाहेर पडू शकतो.

श्रीलंकेचा आतापर्यंतच्या आशिया चषक स्पर्धेत चांगला प्रवास राहिला आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा २ धावांनी पराभव झाला. त्यानंतर सुपर-४मध्ये श्रीलंकेने बांगलादेशचा २१ धावांनी पराभव केला होता. मात्र, त्याला भारताविरुद्ध विजय नोंदवता आला नाही. टीम इंडियाने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. त्याचवेळी रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा २ विकेट्सने पराभव केला.

हेही वाचा: Joe Root: जो रूटचे भारतीय फलंदाजांबाबत मोठे विधान; म्हणाला, “’सूर्यकुमार हा सचिन, पीटरसनसारख्या…”

अंतिम फेरीत भारताविरुद्ध विजय मिळवणे श्रीलंकेसाठी सोपे नसेल. मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना संघाने २१३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १७२ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे धावांचा पाठलाग करणे प्रेमदासा स्टेडियमवर खूप अवघड काम आहे. तेथील खेळपट्ट्या या फिरकीपटूंना साथ देणाऱ्या आहेत. भारताच्या कुलदीप यादवने सुपर -४ सामन्यांमध्ये ९ विकेट्स काढल्या आहेत.

Story img Loader