Bangladesh vs Sri Lanka Match Updates: आज, आशिया कप २०२३ मधील सुपर-4 सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेश संघ आमनेसामने येतील. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येथे ८० ते ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे वाया जाऊ शकतो, असे म्हटले होते, परंतु सध्या कोलंबोमधून एक चांगली बातमी आहे. सध्या हवामान पूर्णपणे स्वच्छ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलंबोमध्ये हवामान कसे आहे?

सध्या कोलंबोमध्ये हवामान स्वच्छ आहे, परंतु अॅक्य वेदरनुसार पावसामुळे खेळात अडथळा येऊ शकतो. संध्याकाळी ६ वाजता आणि रात्री १० वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, वेदर डॉट कॉमनुसार या सामन्यावर पावसाचा धोका असून पावसाची ७० टक्के शक्यता आहे. श्रीलंकेच्या हवामान खात्याने संध्याकाळी साडेसात नंतर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोलंबोमध्ये तापमान २७-३० अंशांच्या दरम्यान असेल.

बांगलादेशसाठी ‘करा या मरो’ स्पर्धा –

सुपर-4 मधील श्रीलंकेचा हा पहिलाच सामना आहे, तर बांगलादेश संघ आपला दुसरा सामना खेळणार आहे. सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पाकिस्तानकडून सात विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशसाठी आजची लढत ‘करो या मरो’ अशी आहे. बांगलादेशला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, तर आशिया चषक स्पर्धेतील त्यांचा प्रवास संपुष्टात येईल.

हेही वाचा – शुबमन गिलच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने दिल्या जबरदस्त शुभेच्छा, नेटकरी म्हणाले, “साराच्या खऱ्या अकाऊंटवरून…”

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

श्रीलंका: पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, महिश थेक्षाना, कसून राजिता आणि मथिशा पथिराना.

हेही वाचा – Asia Cup 2023: सुपर-4 फेरीपूर्वी विराट कोहलीने श्रीलंकेच्या खेळाडूंना केले मार्गदर्शन, VIDEO होतोय व्हायरल

बांगलादेश: मोहम्मद नईम, मेहदी हसन मेराज, लिटन दास, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शकीब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसेन, मेहदी हसन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 super four first match bangladesh vs sri lanka updates vbm