Team India on Asia Cup 2023: आशिया कप २०२३ साठी भारतीय संघ बुधवारी श्रीलंकेत पोहोचला. टीमचे सर्व सदस्य कोलंबो विमानतळावर उतरले. टीम इंडिया फ्लाइटने बुधवारी दुपारी बंगळुरूहून निघाली, त्यानंतर काही वेळातच ते कोलंबोला पोहोचले. बंगळुरूपासून श्रीलंकेचे अंतर अवघे दीड तासाचे आहे. त्यांचा विमानतळावर पोहचल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ कोलंबोला पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंनी फ्लाइट टेक ऑफ करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी कोलंबो विमानतळावर उतरतानाचे व्हिडिओ आणि छायाचित्रेही समोर आली आहेत. जिथे कर्णधार रोहित शर्मासोबत विराट कोहली, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराहसह इतर खेळाडूही दिसले.

हेही वाचा: PAK vs NEP: बाबर-इफ्तिकार यांची अफलातून शतकं! नेपाळसमोर पाकिस्तानने ठेवले ३४३ धावांचे डोंगराएवढे आव्हान

श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषकाच्या सामन्यासाठी संपूर्ण भारतीय संघ पोहोचला आहे, मात्र के.एल. राहुल अजूनही बंगळुरूमध्येच आहे. लोकेश राहुल सध्या एनसीएमध्ये असून मॅच सिम्युलेशनमध्ये भाग घेईल. विशेष म्हणजे राहुल आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान आणि भारत विरुद्ध नेपाळ या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.

ही माहिती देताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, “के.एल.चा आमच्यासोबतचा चांगला आठवडा गेला, तो फॉर्ममध्ये आला असून त्याच्यात सुधारणा होत आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी तो उपलब्ध होणार नाही. दुसरीकडे संघात पुनरागमन करणारे श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराहही संघासोबत कोलंबोला पोहोचले आहेत. त्याआधी बुमराहने आशिया कपपूर्वी आयर्लंड मालिकेत भाग घेतला आणि संघाचे नेतृत्व करत २-० अशी मालिका जिंकली. दुसरीकडे दुखापतीतून सावरल्यानंतर अय्यरने अद्याप स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही.

हेही वाचा: IND vs PAK Head-to-Head: सहा वर्षांपासून वन डे क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध अपराजित, ‘हा’ आहे आशिया कपमधील विक्रम

एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६६ आणि पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४८च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या ५० षटकांच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६ शतकांचा समावेश आहे, त्यापैकी २६ शतके ही धावांचा पाठलाग करताना झळकावली आहेत. वन डेमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

आशिया चषक २०२३ सुरू होण्याच्या एक दिवस आधी, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली म्हणाला की एकदिवसीय फॉर्मेटने नेहमीच त्याच्यामध्ये सर्वोत्तम गोष्टी आणल्या आहेत. २०२३च्या आयसीसी विश्वचषकापूर्वी आशिया चषक ही भारतीय संघासाठी चाचणी परीक्षा असणार आहे. आशिया चषक आणि विश्वचषक दरम्यान, भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे.