BAB vs AFG, Asia Cup 2023: आशिया चषक २०२३चा चौथा सामना ३ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाईल. ब गटातील पहिल्या सामन्यात बांगलादेशला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. अशा परिस्थितीत हा सामना त्याच्यासाठी करा किंवा मरो सारखा असेल. अफगाणिस्तानचा हा स्पर्धेतील पहिला सामना असेल. बांगलादेशचा संघ हा सामना जिंकल्यास स्पर्धेत कायम राहील. ती हरली तर ती बाहेर पडेल. श्रीलंकेचा संघ गटात अव्वल स्थानावर आहे.

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगानिस्तान संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली फिरकी गोलंदाजी करणारे फिरकीपटू आहेत. त्यात स्टार खेळाडू राशिद खानसारख्या खेळाडूचे बांगलादेशसमोर मोठे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या उभारून खूप जास्त फरकाने सामना जिंकावा लागेल, म्हणजेच जर पुढील सामना अफगानिस्तानने जरी जिंकला तरी त्यांचा रन रेट हा चांगला राहील. लाहोरची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक आहे. त्यात रात्री ड्यू फॅक्टर असल्यास बांगलादेशला गोलंदाजी करताना अधिक अडचणी येऊ शकतात.

India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Ravindra Jadeja 12 wickets help Saurashtra beat Delhi by 10 wickets in Ranji Trophy 2025 Elite Group match
Ranji Trophy 2025 : जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राने पंतच्या दिल्लीचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा

श्रीलंकेत भारत आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर, आशिया चषक २०२३ स्पर्धा पुन्हा एकदा पाकिस्तानात जाईल जेव्हा रविवारी बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ एकमेकांसमोर येतील. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाने श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना पाच गडी राखून गमावल्यानंतर, दुसरा सामना कोणत्याही किंमतीत जिंकून सुपर४ मध्ये स्थान निश्चित करायचे आहे. अफगाणिस्तान संघाला पहिला साखळी सामना जिंकून आशिया कप मोहिमेची चांगली सुरुवात करायची आहे.

हेही वाचा: Heath Streak Death: काही दिवसांपूर्वी मृत्यूची अफवा अन् आज ४९व्या निधन; झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हिथ स्ट्रीकची कर्करोगाशी झुंज अपयशी

अफगाणिस्तानकडून खूप आशा आहेत

दरम्यान, अलीकडेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी पाकिस्तानचा सामना केला आणि ३-०च्या फरकाने त्यांचा पराभव झाला. आशिया चषक २०२३ मध्ये अफगाण संघाचे पुनरागमन होईल अशी आशा आहे. हशमतुल्ला शाहिदी अफगाण संघाचे नेतृत्व करत राहील. करीम जनातचे संघात पुनरागमन झाले आहे आणि यामुळे संघाला बळ मिळाले आहे.

बांगलादेश वि अफगाणिस्तान खेळपट्टी अहवाल

गद्दाफी स्टेडियमचा खेळपट्टी ही फलंदाजीसाठी चांगली आहे. आपण यापूर्वी पाहिले आहे की फलंदाज येथे फलंदाजीचा आनंद घेतात आणि गोलंदाज अनेकदा आपली छाप पाडण्यात अपयशी ठरतात. मात्र, येथे गोलंदाजी करताना फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.

हेही वाचा: IND vs PAK: रोहित-विराटच्या विकेटनंतर शाहीन आफ्रिदीचे मोठे विधान; म्हणाला, “माझ्यासाठी दोन्ही सारखेच पण…”

दोन्ही संघाची प्लेईंग ११

बांगलादेश: मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहिद हृदोय, शमीम हुसेन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, हसन महमूद

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान, फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान

Story img Loader