Asia Cup 2023 Dates Announced: आशिया कप २०२३ या स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील १३ सामने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ संघांत होणार आहेत. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत. याशिवाय उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत.

पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकेत नऊ सामने होणार –

आशिया चषक स्पर्धेबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे मिटला आहे. ही स्पर्धा आता दोन देशांमध्ये आयोजित केले जाणार आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. उर्वरित नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषकाच्या या हंगामात दोन गट असतील. यावेळी आशिया चषक पाकिस्तानात होणार होता. मात्र भारतीय संघाने पाकिस्तामध्ये जाण्यास नकार दिला. या कारणासाठी, हायब्रीड मॉडेल निवडले आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम

वेळापत्रक अद्याप जाहीर नाही –

आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखेची माहिती दिली आहे. परिषदेने अधिकृत संकेतस्थळावरही याबाबत माहिती दिली आहे. मात्र सामन्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतील. या दोन्ही संघांमध्ये अनेक दिवसांपासून द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. हे संघ फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्येच आमनेसामने येतात.

हेही वाचा – IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हरभजन सिंगने निवडला संघ, ‘या’ युवा खेळाडूंना दिली संधी

यंदाचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार –

१५ वर्षांनंतर आशिया चषकाचे सामने पाकिस्तानात होणार आहेत. २००८ मध्ये पाकिस्तानने शेवटच्या आशिया कपचे यजमानपद भूषवले होते. तेव्हा श्रीलंका अंतिम फेरीत भारताचा पराभव करून चॅम्पियन बनला होता. त्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनथ जयसूर्याच्या 125 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ४९.५ षटकांत २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ ३९.३ षटकांत १७३ धावांत सर्वबाद झाला आणि १०० धावांनी पराभूत झाला. या सामन्यात श्रीलंकेकडून अंजथा मेंडिसने ६विकेट घेतल्या. पुढे वनडे विश्वचषक असल्याने यंदाचा आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

Story img Loader