Team India: भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीला यावेळी विश्रांती देण्यात आली आहे. हे दोन्ही फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतही सहभागी नाहीत. मात्र या विश्रांतीनंतर दोन्ही खेळाडू आशिया चषक २०२३च्या शिबिरासाठी २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (NCA) अहवाल देतील. एन.सी.ए. २४ ते २९ ऑगस्ट या कालावधीत आठवडाभराच्या शिबिराचे आयोजन करत आहे. तसेच संजू सॅमसन देखील या शिबिरात सहभागी होणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण त्याची संघात निवड होणार का? यावर हे सर्व अवलंबून असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली हे सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय टी२० संघाचा भाग नाहीत. पण आशिया चषक २०२३च्या आधी दोन्ही खेळाडू सुट्टीचा आनंद घेत आहेत. आयसीसी विश्वचषक २०२३ची तयारी सुरू करण्यापूर्वी वरिष्ठ खेळाडू आशिया कपमध्ये भाग घेतील.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “रोहित आणि विराट २३ ऑगस्टला एन.सी.ए.ला अहवाल देतील.” हे दोन्ही खेळाडू टी२० संघाचा भाग नाहीत कारण BCCI ने ICC २०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील तरुण संघाची निवड केली आहे. आशिया चषकावर लक्ष केंद्रित केले जात असताना, ही जोडी आशिया चषकासाठी संघात सामील होईल आणि मोठ्या स्पर्धेपूर्वी त्यांची तंदुरुस्ती सुधारण्यासाठी बंगळुरू येथील एन.सी.ए. येथील सराव शिबिरात सहभागी होणार आहे.

हेही वाचा: Ben Stokes: इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सची विमानातून बॅग गायब, सोशल मीडियावर मदत मागितली, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

रोहित आणि कोहली आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहेत आणि २ सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. इतर खेळाडूंमध्ये, के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही आशिया कप २०२३च्या शिबिरात सामील होतील, परंतु संजू सॅमसनचा समावेश होण्याची शक्यता फारच कमी आहे. सॅमसनला संघात संधी मिळाल्यास तो शिबिराच्या शेवटच्या २ दिवसात सहभागी होईल.

भारताच्या वेस्ट इंडिज दौर्‍याच्या समाप्तीनंतर, टीम इंडियाने आशिया चषक स्पर्धेची तयारी सुरू केल्याने खेळाडूंचा मुख्य संघ भारतात परतेल. दुसरीकडे, संघ ३ सामन्यांच्या T20I मालिकेत भाग घेण्यासाठी आयर्लंडला जाणार आहे. या दौऱ्यावर जसप्रीत बुमराह भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार असून राजस्थान रॉयल्सचा यष्टिरक्षक संजू सॅमसन देखील संघाचा एक भाग आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कप आधी वकार युनूसने रोहितला दिला इशारा; म्हणाला, “आमच्याकडेही मॅच…”, पाहा video

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “बुमराह आशिया कप संघासाठी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कॅम्पमध्ये असेल. आशिया चषकासाठी त्याची निवड झाल्यास तो शेवटचे दोन दिवसच शिबिरात सहभागी होईल. आयर्लंड मालिकेनंतर संजूला विश्रांतीची गरज आहे. कमी कालावधीत बरेच सामने आणि प्रवास केल्याने तो सराव शिबिरात सहभागी होणार का? याबाबत साशंकता आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 virat rohit and samson to join nca for asia cup training camp find out avw