BCCI’s Five-Nation tournament: आशिया चषक २०२३ बाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या वर्षी होणारी आशिया चषक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याने पाच देशांदरम्यान वेगळी स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखीत आहे. याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दिली आहे. असे असले तरी पाकिस्तानने स्पर्धेच्या यजमानपदावर आपली भूमिका कायम ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीसीसीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, भारतीय संघ आशिया चषक २०२३ खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. त्यामुळे ही स्पर्धा काही तटस्थ ठिकाणी हलवली जाईल, असेही सांगण्यात आले होते. यापूर्वी २०१८ मध्ये आशिया चषकाचे आयोजन भारताने केले होते, परंतु काही कारणांमुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा: IPL 2023: पाणीपुरी विकणारा मुलगा झाला करोडपती! आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या यशस्वीची कहाणी…

पीसीबीच्या ‘क्रिकेट पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या वेबसाइटने याबाबत संपूर्ण माहिती शेअर केली आहे. या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान आपल्या आडमुठेपणावर ठाम आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होऊ शकते. एवढेच नाही तर आशिया चषक रद्द झाल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्या काळात पाच देशांदरम्यान बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णयही घेतला असल्याचे त्या अहवालात म्हटले आहे. मात्र, असे असूनही पाकिस्तान आपल्या ‘हायब्रीड मॉडेल’ आणि पाकिस्तानमध्येच स्पर्धा आयोजित करण्याच्या जिद्दीपासून मागे हटायला तयार नाही.

स्पर्धा रद्द होऊ शकते का?

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ही स्पर्धा आपल्याच देशात घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. हे पाहता ही स्पर्धा (आशिया चषक २०२३) रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख जय शाह यांनी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत सांगितले की, “२०२३ आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण निश्चित करण्यासाठी आणि भारत-पाकिस्तान सामन्याबाबत स्पष्टता मिळविण्यासाठी आम्ही इतर देशांच्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत.”

हेही वाचा: IPL 2023: रोहितचा वाढदिवस ३५वा की ३६वा? हिटमॅनने अशी गुगली टाकली की समालोचक हर्षा भोगले देखील झाले हैराण

एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानची विचित्र स्थिती

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने एक ‘हायब्रीड मॉडेल’ आणले होते, ज्यानुसार भारतीय संघाला त्यांचे सामने तटस्थ ठिकाणी खेळावे लागणार होते. परंतु बीसीसीआयचे सचिव आणि आयसीसी क्रिकेट कौन्सिलचे प्रमुख जय शाह यांना बहुधा हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्याच वेळी पाकिस्तान ही स्पर्धा आपल्याच देशात आयोजित करण्यावर ठाम आहे. मागील काही अहवालांमध्ये, हे देखील उघड झाले होते की हायब्रीड मॉडेल सादर करूनही, पाकिस्तानने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी अटी ठेवल्या होत्या. त्यांच्या मते, काही निवडक ठिकाणीच पाकिस्तानकडून सामने खेळण्याची ऑफर होती. म्हणजेच, आता हळूहळू हे स्पष्ट होत आहे की ‘हायब्रीड मॉडेल’ हा पर्याय काम करीत नाही. त्याचे मुख्य कारण आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानही भारतासारख्या काही अटी ठेवीत आहे.