IND vs PAK, Asia Cup 2023: आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे कायम ठेवण्यात आले आहे. ३१ ऑगस्टपासून सुरू होईल आणि अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशियाई क्रिकेट परिषद १४ जुलै रोजी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करू शकते. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाईल. आशिया चषक स्पर्धेतील सुरुवातीचे सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाणार याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

आशिया चषक २०२३च्या वेळापत्रकावरील मोठे अपडेट

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांनी आशिया कप २०२३ साठी हायब्रीड मॉडेलवर सहमती दर्शवली आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान किमान दोनदा आमनेसामने येणार असून दोन्ही देश अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास त्यांचा हा तिसरा सामना असेल. वृत्तानुसार, दोन्ही संघांमधील हे सर्व सामने श्रीलंकेतील डांबुलायेथे खेळवले जाऊ शकतात.

mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Narendra Modi
Narendra Modi : देश आता ‘मिशन मोड’मध्ये; अर्थसंकल्पाच्या आधीच मोदींनी सांगितली विकसित भारतासाठी त्रिसुत्री!
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
INDW beat SLW BY 60 Runs with third Consecutive Win in U19 T20 World Cup 2025
INDW vs SLW: भारताच्या लेकींनी वर्ल्डकपमध्ये नोंदवला सलग तिसरा विजय, श्रीलंकेचा मोठा पराभव; उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदविकाराचा झटका; प्रशासनाच्या तयारीमुळे वाचले प्राण
India Probable Playing XI for IND vs ENG 1st T20I Kolkata Pitch Report and Weather
IND vs ENG: भारत-इंग्लंड पहिल्या टी-२०साठी कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन? हवामानाचा सामन्यावर होऊ शकतो परिणाम

हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडिया करत आहे खास सराव, video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

डांबुलामध्ये भारत-पाकिस्तानची होऊ शकते लढत

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दोन सामने डांबुला येथे होण्याची शक्यता आहे. जर संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले तर तिसरा सामनाही त्या ठिकाणी होऊ शकतो. बर्‍याच विचारविनिमयानंतर, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांनी महाद्वीपीय स्पर्धेच्या आगामी वेळापत्रकावर चर्चा करण्यासाठी डरबन येथे भेट घेतली आणि श्रीलंकेला येथे सामने होतील असे निश्चित केले.

डांबुला भारत आणि पाकिस्तान संघांचा कसा आहे रेकॉर्ड

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेतील डांबुला येथे आतापर्यंत एकूण १८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी टीम इंडियाने ११ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघाने या सामन्यावर आतापर्यंत १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत, अशा स्थितीत, डांबुलाच्या मैदानावर कुठेतरी टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानला जाणार नाहीत, खुद्द जय शाहांनीच सांगितले; ‘या’ दिवशी होणार वेळापत्रक जाहीर

दोन देशातील ही स्पर्धा सहा संघांमध्ये रंगणार आहे

आशिया कप २०२३ मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ मैदानात उतरले आहेत. नेपाळचा संघ प्रथमच या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ लक्षात घेऊन, यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाईल. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या संघांना एका गटात ठेवण्यात आले आहे आणि गतविजेत्या श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दुसऱ्या गटात आहेत.

Story img Loader