सिल्हेट : शफाली वर्मा (४४ चेंडूंत ५५ धावा) आणि स्मृती मानधना (३८ चेंडूंत ४७) या सलामी फलंदाजांच्या महत्त्वपूर्ण योगदानांच्या बळावर भारतीय संघाने शनिवारी महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात यजमान बांगलादेशवर ५९ धावांनी मात केली. भारतीय संघाला गेल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, सलग दुसऱ्या दिवशी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध कामगिरीत सुधारणा केली. या सामन्यात ५ बाद १५९ अशी धावसंख्या उभारल्यानंतर भारताने बांगलादेशला २० षटकांत ७ बाद १०० धावांवर रोखले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ५ बाद १५९ (शफाली वर्मा ५५, स्मृती मानधना ४७; रुमाना अहमद ३/२७) विजयी वि. बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १०० (निगार सुलताना ३६, फरगाना हक ३०; शफाली वर्मा २/१०, दीप्ती शर्मा २/१३)

Story img Loader