Asia Cup Final 2022: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आशिया चषक अंतिम सामन्यात कोहलीला मागे टाकून आशिया चषक २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचे स्थान पटकावले. कोहलीच्या २७६ धावांपेक्षा ५० धावा कमी असलेल्या रिझवानने अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४९ चेंडूत ५५ धावा केल्या. मात्र दुसरीकडे भानुका राजपक्षेच्या नाबाद ७१ धावा आणि वानिंदू हसरंगाच्या अष्टपैलू प्रदर्शनामुळे श्रीलंकेने रविवारी २३ धावांनी विजय मिळवला व सहाव्यांदा आशिया चषक विजेतेपदावर श्रीलंकेचे नाव कोरले.

रिझवान हा पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता परंतु त्याच्या आळशी पध्दतीने वसीम अक्रमसह अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली. हॉंगकॉंगविरुद्ध रिझवानच्या कामगिरीवर वासिम अक्रम यांनी टीका करताच ऑनलाईन अक्रम यांनाच फटकारले होते.

PAK vs SL : भारतीय क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला, केली अजब मागणी; म्हणाले “सामना पाहायचा असेल तर…”

याबद्दल सांगताना अक्रम म्हणतात की, “तुम्हाला आठवत असेल तर रिझवानने हाँगकाँगविरुद्धही आळशी खेळी खेळली होती. मी त्याच्यावर टीका केली पण ते त्याच्या हितासाठीच होते. पण त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी माझ्यावर हल्ला केला. पाकिस्तानी लोक म्हणाले की मी रिझवानला पाठिंबा देत नाही. जर तुम्ही मला माझे मत हवे आहे, मी तुम्हाला योग्य आणि सरळ मत देईन. मी जे पाहतो त्याबद्दल खोटे बोलणारा मी नाही. माझ्यासाठी काळा काळा आणि पांढरा पांढरा आहे.”

बाबर आझम आणि फखर जमान यांना स्वस्तात बाद केल्यामुळे पाकिस्तानची चांगली सुरुवात झाली नाही. रिझवान आणि इफ्तिकार अहमद यांनी डाव स्थिर केला. दुसरीकडे रिझवानने चमिका करुणारत्नेच्या चेंडूवर षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले पण नंतर अगदी सोप्या चेंडुवरच तो बाद झाला. रविवारी पाकिस्तानच्या पराभवामागे या खेळाडूंची असमाधानकारक कामगिरी कारण ठरल्याचे म्हंटले आहे.

Story img Loader