Mohammad Siraj took 4 wickets in one over to complete his 50 wickets in ODI cricket: आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका हे संघ आज आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांतील हा फायनल सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा हा निर्णय भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज चुकीचा ठरवला. कारण त्याने एकाच षटकात ४ विकेट्स घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने एक खास कामगिरी केली.

सिराजने एका षटकात घेतल्या ४ विकेट्स –

मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात सहा चेंडूत चार बळी घेतले. प्रथम, त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमाला एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली. पाचवा चेंडू चौकारासाठी गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. निसांकाला दोन तर धनंजयला चार धावा करता आल्या. त्याचवेळी समरविक्रम आणि असलंका यांना खातेही उघडता आले नाही.

सिराजने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील ५० विकेट्सचा टप्पाही केला पार –

श्रीलंकेला सहाव्या षटकात १२ धावांवर सहावा धक्का बसला. सिराजने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आणि क्लीन बोल्ड कर्णधार दासुन शनाकाला तंबूत पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. सहा षटकांनंतर श्रीलंकेची धावसंख्या सहा विकेटवर १३ धावा आहे. या दरम्यान मोहम्मद सिराजने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील ५० विकेट्सचा टप्पाही पार केला आहे. त्याचबरोबर तो आशिया चषकाच्या फायनल सामन्यात एका षटकांत ४ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

मोहम्मद सिराजने रचला इतिहास, कमीत कमी चेंडूत घेतले ५ विकेट्स –

आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद. सिराजने इतिहास रचला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कमी चेंडूत ५ बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याने अवघ्या १६ चेंडूत ५ विकेट घेत इतिहास रचला आणि याआधी वनडे क्रिकेटमध्ये इतक्या कमी चेंडूंमध्ये विकेट घेण्याचा पराक्रम कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केला नव्हता.

हेही वाचा – Asian Games स्पर्धेपूर्वी इलावेनिल वालारिवनचा डबल धमाका, ISSF विश्वचषक स्पर्धेत जिंकले दुसरे सुवर्णपदक

मोहमद सिराजने शमीच्या विक्रमाशी केली बरोबरी –

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद ५० विकेट्स घेण्याच्या बाबतीत, सिराजने मोहम्मदचा शमीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. सिराजने २९व्या एकदिवसीय सामन्यात ५० विकेट्स पूर्ण केले तर याआधी शमीने २९ सामन्यात ५० विकेट्स घेतले होते. भारतासाठी अजित आगरकरने २३ सामन्यांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० विकेट्स घेतल्या आणि तो पहिल्या स्थानावर आहे तर सिराज आता शमीसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आला आहे.

भारतासाठी सर्वात जलद ५० एकदिवसीय विकेट घेणारे गोलंदाज –

२३ सामना – अजित आगरकर
२४ सामने- कुलदीप यादव<br>२८ सामने- जसप्रीत बुमराह<br>२९ सामना – मोहम्मद सिराज<br>२९ सामना – मोहम्मद.शमी

Story img Loader