Asia Cup Final 2023 India vs Sri Lanka Match Updates: भारत आणि श्रीलंकेने आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या दोघांमधील विजेतेपदाची लढत रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ अनेक बदलांसह या सामन्यात प्रवेश करू शकतो. याआधी बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले होते. अंतिम सामन्यापूर्वी संघातील अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतिम सामन्यापूर्वी विश्रांती देण्यात आलेल्या सर्व खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे. या खेळाडूंमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी सर्व खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये परत घेण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

टीम इंडियाची अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन –

कर्णधार रोहित शर्मासोबत शुबमन गिल ओपनिंग करताना दिसणार आहेत. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. विराट कोहलीही तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. अशाप्रकारे संघाच्या आघाडीच्या फळीत कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांची उपस्थिती निश्चित आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा – Asia Cup 2023 Final: भारत आणि श्रीलंका यांच्यात आठव्यांदा होणार फायनल, जाणून घ्या कोणी जिंकले सर्वाधिक जेतेपद

तसेच मुख्य यष्टिरक्षक म्हणून संघात सामील झालेला केएल राहुल चौथ्या क्रमांकावर दिसू शकतो. याशिवाय डावखुरा इशान किशन पाचव्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळू शकतो. इशान आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. याशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आणि रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

टीम इंडियाचा असा असेल गोलंदाजी विभाग –

आठव्या क्रमांकापासून गोलंदाजी विभागाला सुरूवात होईल. फिरकीपटू कुलदीप यादव आठव्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. संघाची फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. खालच्या फळीत चांगली फलंदाजी करून संघासाठी महत्त्वाच्या धावा जोडण्याची क्षमता शार्दुलमध्ये आहे. याशिवाय स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा – World Cup 2023: ‘कोई भी आए, देख लेंगे…’; एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सुरेश रैनाने विरोधी संघांना दिला इशारा

भारत-श्रीलंका सामन्याचा हवामान अहवाल –

कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हवामानाच्या परिस्थितीनुसार फलंदाजी करणे अजिबात सोपे होणार नाही. हवामान खात्यानुसार, रविवारी कोलंबोमध्ये काळे ढग असतील. दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसामुळे खेळात व्यत्यय येईल. मात्र, अंतिम फेरीसाठी एसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. पावसामुळे उद्या सामना न झाल्यास सोमवारी (१८ सप्टेंबर) सामना होईल आणि सोमवारीही पावसामुळे सामना न झाल्यास दोन्ही संघाना संयुक्तपणे विजेते म्हणून घोषित केले जाईल.

अंतिम सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup final 2023 india vs sri lanka know team indias playing xi and weather report vbm