‘आशिया चषक ट्वेन्टी-२०’ क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारी भारताने हाँगकाँगवर ४० धावांनी मात करत ‘सुपर ४’ मधील आपलं स्थान पक्कं केलं. सूर्यकुमार यादव (नाबाद ६८ धावा) आणि विराट कोहली (नाबाद ५९) यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने केलेली खेळी पाहून विराट कोहलीदेखील अवाक झाला. १४ व्या ओव्हरमध्ये मैदानात आलेल्या सूर्यकुमार मैदानात चारही बाजूला फटकेबाजी करत पुन्हा एकदा आपलं कसब सिद्ध केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीच्या षटकांत काही चांगले फटके मारताना १३ चेंडूंत २१ धावा केल्यावर त्याला आयुष शुक्लाने बाद केले. तसंच केएल राहुलला या सामन्यातही सूर गवसला नाही. त्याने ३६ धावांची खेळी केली, पण त्यासाठी ३९ चेंडू घेतले.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारताचा ‘अव्वल चार’ फेरीत प्रवेश; हाँगकाँगवर ४० धावांनी मात; सूर्यकुमार, कोहलीची अर्धशतके

सूर्यकुमार आणि विराट या जोडीने मात्र अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. मुंबईकर सूर्यकुमारने मैदानाच्या चारही कोपऱ्यांत फटकेबाजी केली. त्याने २६ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. तर, विराटने ४४ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५९ धावांची केली. सूर्यकुमार-विराट जोडीने सात षटकांतच ९८ धावांची भर घातली.

विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवने मारलेल्या एकूण सहा षटकारांपैकी चार षटकार शेवटच्या षटकात मारले आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सूर्यकुमारची खेळी पाहून विराट कोहलीने त्याच्यासमोर झुकत कौतुक केलं. कोहलीची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

१९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या हाँगकाँगला २० षटकांत ५ बाद १५२ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून बाबर हयात (३५ चेंडूंत ४१), किंचित शहा (२८ चेंडूंत ३०) आणि झीशान अली (१७ चेंडूंत नाबाद २६) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, मधल्या षटकांत त्यांना वेगाने धावा न करता आल्याने त्यांचा पराभव झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup ind vs hong kolng virat kohli reaction on suryakumar yadav knock is viral sgy