INDvsPAK : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने अटीतटीचे होत आहेत. हे सामने टी-२० फॉरमॅटमधील असल्यामुळे चौकार आणि षटकार यांचा अक्षरश: पाऊस पडलेला पाहायला मिळतोय. सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू झाले असून यामध्ये आज भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. पाकिस्तान संघ मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघ आपली विजयी कामगिरी कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत असणार आहे. त्यामुळे आजच्या या महमुकाबल्यात कोणाचा विजय होणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
हेही वाचा >> भारत-पाक महामुकाबल्यात पाकिस्तानचा ‘हा’ दिग्गज गोलंदाज नसणार, टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठे फटके मारता येणार?
भारतीय संघाला रवींद्र जडेजाच्या रुपात मोठा फटका बसला आहे. हाँगकाँगविरोधातील सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. याच कारणामुळे तो आशिया स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अष्टपैलू जडेजाची जागा कोण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या सामन्यात ऋषभ पंतला संधी दिली जाणार का? हे पाहणेही उत्सुकतेचे ठऱणार आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान हे संघ २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. हार्दिक पंड्या-रवींद्र जडेजा या जोडीने केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे भारताला यशाची गोडी चाखता आली होती. दरम्यान, आजच्या सामन्यात भारताचा कोणता खेळाडू कमाल दाखवणार? याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
हेही वाचा >> भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर? होणार मोठी शस्त्रक्रिया
तर दुसरीकडे २८ फ्रेब्रुवारी रोजी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा पाकिस्तानी संघाकडून पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. त्या दृष्टीने पाकिस्तान आपले प्लेइंग ११ निवडण्याची शक्यता आहे. भारताला रवींद्र जडेजाच्या रुपात जसा धक्का बसलेला आहे. अगदी तशाच पद्धतीने गोलंदाज शाहनवाझ दहनीच्या रुपात पाकिस्तानलाही फटका बसला आहे. दुखापतीमुळे तो आजचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे पाकिस्तान संघात दहनीची जागा भरून काढणाऱ्या कोणत्या खेळाडूचा समावेश होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठऱणार आहे.
सामना कोठे, कधी होणार?
आजचा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे.
सामना कोठे पाहता येणार?
स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (एचडी वाहिन्या) तसेच Disney Plus Hotstarवर हा सामना पाहता येईल.
हेही वाचा >>> Dhanashree Verma Surgery : धनश्री वर्मावर करण्यात आली शस्त्रक्रिया, फोटो केला शेअर; नेमकं काय झालं होतं?
भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>
पाकिस्तान संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, उस्मान कादीर, मोहम्मद हसनैन, हरिस रौफ, नसीम शाह.