यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर ‘मारो मुझे मारो’ फेम मोमीन साकिब पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेल्या आजच्या सामन्याविषयी बोलताना थेट मैदानावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. पाकिस्तानने आजचा सामना जिंकावा. आज पाकिस्तान सामना जिंकू शकला नाही, तर मी वेडा होईन, असे मोमीन म्हणाला आहे.

हेही वाचा >> INDvsPAK, Asia Cup 2022 : आज पुन्हा ‘भारत-पाकिस्तान’ लढत; सामना कोठे आणि किती वाजता होणार? जाणून घ्या दोन्ही संघांचे Playing 11

भारत-पाकिस्तान यांच्यात सामना असला की ‘मारो मुझे मारो’ डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेल्या मोमीन साकिब चर्चेत येतो. मोमीन आजचा सामना पाहण्यासाठी थेट दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पोहोचला आहे. तसेच त्याने थेट मैदानावर जाऊन सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो भारत-पाकिस्तान सामन्याविषयी बोलत असून पाकिस्तानने आजच्या सामन्यात काहीही झाले तरी विजय मिळवावा, असे आवाहन तो करताना दिसतोय. “भारत-पाकिस्तान यांच्यात आज सामना होणार आहे. आज हे मैदान प्रेक्षकांनी पूर्ण भरलेले असेल. आजच्या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल. आज होणारा भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. पाकिस्तानने कृपया आजतरी विजय मिळवावा. मागील पराभवामुळे माझा फार भावनिक तोटा झालेला आहे. आज पाकिस्तान जिंकला नाही, तर मी वेडा होईल,” असे मोमीन मिश्किलपणे म्हणताना दिसतोय.

हेही वाचा >> IPL 2023 मध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व कोण करणार? मोठी माहिती आली समोर

दरम्यान, आज यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. याआधी २८ ऑगस्ट रोजी हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाच गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

Story img Loader