IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघ एकमेकांचे पारंपरिक स्पर्धक असल्यामुळे या सामन्यात कोणाची सरशी होणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानचे सर्वच खेळाडू आपल्या दंडाला काळ्या फिती लावून मैदानात उतरणार आहेत. त्याचं कारण पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भारत-पाक लढतीआधी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का, भारताच्या धडाकेबाज खेळाडूने घेतली निवृत्ती

एकीकडे भारत-पाक यांच्यात आज युएईमध्ये लढत होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मागील अनेक दिवसांपासून कसून सराव करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानी संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी झालेला असला तरी पाकिस्तानमध्ये मात्र पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याच पुरग्रस्तांसोबत आहोत, असा संदेश देण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळ्या फिती लावून मैदानात उतरणार आहेत.

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 Live Update : भारत-पाक सामना विराटसाठी ठरणार खास, मैदानात उतरताच नोंदवणार ‘हा’ नवा विक्रम

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा (KP), बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. पुरामुळे येथे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुरासोबतच या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पुरामुळे खैबर पख्तुनख्वा या भागात नागरिकांची घरं तसेच बँका वाहून गेल्या आहेत. तर बलुचिस्तानचा पाकिस्तानशी संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे पूरग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी तसेच अशा परिस्थितीत पूर्ण पाकिस्तान तुमच्यासोबत आहे, हा संदेश देण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू भारताविरोधातील सामन्यात दंडाला काळ्या फिती लावणार आहेत.

हेही वाचा >>> IND vs Pak सामन्याआधी विराट कोहलीचे मोठे विधान, म्हणाला ‘पाकिस्तानचा बाबर आझम जगातील अव्वल फलंदाज’

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा सलामी सामना आहे. यामुळे आशिया चषक स्पर्धेत विजयी सलामी देऊन सुरुवात करण्याचा प्रत्येक संघाचा मानस आहे. भारताचा खेळाडू विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. तो आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडणार का? हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup ind vs pak pakistan cricket team wear black armbands in match prd