Asia Cup 2022 IND vs PAK: भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सुरुवातीच्या दहा मिनिटात आपल्या नावे एक मोठा विक्रम केला आहे. मैदानात येताच दोन षटकार ठोकून रोहित पहिल्या १२ धावांसह टी- २० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा काढलेला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टी- २० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पुरुष खेळाडूंच्या यादीत रोहित अव्व्ल स्थानी होता मात्र महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्स त्याच्यापेक्षा ११ धावांनी पुढे होती. आजच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुंदर खेळीसह रोहितने महिला व पुरुष अशा दोन्ही यादीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे .

महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची फलंदाज सुझी बेट्सने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सुजीच्या नावावर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ३५३१ धावा आहेत. तर आजच्या सामन्याआधी रोहितच्या नावे ३५२० धावांचा रेकॉर्ड होता.

रोहित शर्माच्या टी-२० कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आजवर १३४ सामन्यात २७ अर्धशतके आणि ४ शतकांसह ३५२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ३२ आणि स्ट्राइकरेट १३९.८४ इतका आहे. रोहित शर्माने आजवर टी २० मध्ये १६५ षटकारांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल 171 षटकारांसह प्रथम स्थानी आहे. यासोबतच टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आजवर त्याने सर्वाधिक शतके (4 शतके) केली आहेत.

(भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा)

आशिया चषक 2022 मध्ये आतपर्यंत रोहितने समाधानकारक खेळी दाखवली होती मात्र पाकिस्तान विरुद्ध सामन्यात रोहितच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 18 चेंडूत 12 धावा केल्या होत्या, तर हाँगकाँगविरुद्ध त्याने 13 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषकात आजवर अपराजित राहिला आहे.

Story img Loader