Asia cup 2023: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह अष्टपैलू हार्दिक पांड्या हे आगामी आशिया चषक आणि ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी, भारतीय संघाचा उपकर्णधार होण्यासाठी फेव्हरेट मानले जात आहेत. पांड्याला सध्यातरी नियमित टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, हे बीसीसीआयकडून अधिकृत स्पष्ट करण्यात आलेले नाही. दुसरीकडे, बुमराहला आयर्लंड विरुद्ध शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण होणार? असे प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्चिले जात आहेत.

पीटीआयच्या वृत्तानुसार, भारत विरुद्ध आयर्लंड मालिकेतून परतलेल्या जसप्रीत बुमराहला आशिया चषक आणि विश्वचषक संघातही उपकर्णधारपद मिळू शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “ज्येष्ठतेनुसार आपण विचार केल्यास बुमराह पांड्यापेक्षा पुढे आहे कारण, त्याने २०२२ मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय दौऱ्यात पांड्यापूर्वी तो ‘वन डे’चाही उपकर्णधारही होता. तो पुढे म्हणाला, “जर बुमराहला आशिया चषक आणि विश्वचषक या दोन्हीसाठी वन डेमध्ये उपकर्णधार बनवले तर आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळेच त्याला ऋतुराजऐवजी आयर्लंडमध्ये बुमराहकडे कर्णधारपद देण्यात आले.”

Pakistan Opener Fakhar Zaman says Will miss playing in India in future ICC events ahead Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : ‘भारतात खेळण्याची उणीव भासेल…’, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पण दुबईत…’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
Gautam Gambhir Wants Yashasvi Jaiswal As Next India Captain After Rohit Sharma at loggerheads with Ajit Agarkar
India Next Captain: ऋषभ पंत नाही २३ वर्षीय युवा खेळाडू भारताचा भावी कर्णधार? कोचने केली निवड; गंभीर-आगरकरमध्ये मतभेद
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
PM Modi to youth: Step out of comfort zone to build Viksit Bharat by 2047
युवक देशाला २०४७पर्यंत विकसित करतील ; ‘विकसित भारत युवा नेता संवाद’ मध्ये पंतप्रधान मोदींचा विश्वास
ILT20 2025 Dubai Capitals beat MI Emirates by1runs Gulbadin Naib Player of the match
ILT20 2025 : दुबईने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला चारली पराभवाची धूळ, निकोलस पूरनचे अर्धशतक ठरले व्यर्थ

हेही वाचा: UAE vs NZ: क्रिकेटविश्वात मोठा अपसेट! न्यूझीलंडला हरवून यूएईने रचला इतिहास, १७ वर्षीय अयान खान ठरला सामन्याचा हिरो

रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या मर्यादित षटकांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार असल्याचे आधी सांगितले जात होते, मात्र आता जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाने मोठा ट्वीस्ट आला आहे. अशा परिस्थितीत बुमराहला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी वन डे संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते. रोहित शर्मानंतर बुमराहला वन डे आणि कसोटी फॉर्मेटमध्ये ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

माहितीसाठी की, टीम इंडिया कर्णधारपदाचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. हार्दिक आणि बुमराहच्या आधी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडेही भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते, मात्र दुखापतीमुळे पंत टीम इंडियातून बाहेर आहे. अशा परिस्थितीत आता बुमराह आणि पांड्या यांच्यात कर्णधारपद मिळवण्यासाठीची रस्सीखेच रंजक ठरू शकते.

हेही वाचा: U-19 World Cup: अमेरिकेची ऐतिहासिक कामगिरी! अंडर-१९ विश्वचषकासाठी पहिल्यांदाच ठरली पात्र

अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल संघ गुजरात टायटन्सने बऱ्यापैकी यश मिळवले आहे. पण पांड्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाला द्विपक्षीय टी२० मालिकेत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर हार्दिकवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. पांड्याने देशासाठी एकूण ९२ टी२० सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याला ८१ डावांत २६.७१च्या सरासरीने ७३ यश मिळाले आहे.

Story img Loader